काँग्रेसचे शहराध्यक्ष सलीमुद्दीन जहागीरदार, माजी नगरसेवक
उबेद मिर्झा
मंगरुळपीर : दि. 9 जून
एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या समस्येनं लोकांचं जगणं कठीण झालं आहे. मंगरूलपीर शहरात टेकरी पूरा ,बढ़ाई पूरा ,मदार तकिया ,दिवान पूरा सह इतर अनेक वार्डा मध्ये पाण्याचं संकट गंभीर होत आहे. पाणीटंचाईमुळे स्थानिक प्रशासन आणि शासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. अशाच प्रकारची स्थिती सद्या मंगरूळपीर शहरात आहे. जलसंकट गंभीर झाल्याने स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. नगरपालिकेने नागरिकांकडून कर वसूल केला, तरीही पाणी मिळाले नाही,
लोकांच्या घशाला कोरड पडत आहे, मात्र यंत्रणा केवळ आश्वासने देण्यापुरती मर्यादित आहे. शहरातील 50 टक्के लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. टेकरी पुरा, वाढाई पुरा, मदार टाकिया, दिवाण पुरा यांसारख्या अनेक वॉर्डात पाण्याची टंचाई आहे, केवळ काही वॉर्डांमध्येच योग्य पाणीपुरवठा व्यवस्था आहे.
शुक्रवार, ९ जून रोजी काँग्रेसचे शहराध्यक्ष सलीमुद्दीन जहागीरदार, माजी नगरसेवक उबेद मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली संबंधित प्रभागातील रहिवाशांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पालिकेला १५ जूनपर्यंत लेखी अल्टिमेटम दिला आहे. , नळां मध्ये पाणी आले नाही तर नागरिकांना आंदोलन करण्यास भाग पडेल जाईल. नागरिकांनी तहसीलदार व एसडीएम यांचीही भेट घेऊन पाण्याच्या समस्येबाबत अवगत केले, या वॉर्डातील नागरिकांनी यापूर्वीही अनेकवेळा पालिका मुख्याधिकाऱ्यांना आपल्या समस्या सांगितल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.पालिकेने कराच्या नावाखाली नागरिकांकडून लाखो रुपये वसूल केले, कनेक्शन आहे मात्र नळ कोरडे असल्याचे नागरिकांनी सांगितले.बोलताना स्थानिक लोक म्हणाले की, आमचं वार्ड गेल्या 6महिन्या पासून आमच्याकडे पाण्याची सोय नाही. येथील महिलांना पाणी आणण्यासाठी दररोज पायपीट करावी लागते. तरी
पालिकेला १५ जूनपर्यंत लेखी अल्टिमेटम दिला आहे. , नळां मध्ये पाणी आले नाही तर नागरिक आंदोलन करतील व याची जवाबदारी संबंधित विभागावर राहील ,नळाला पाणी द्या नाहीतर तीव्र आंदोलन करू
0 Comments