Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना IMD चा इशारा!

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असल्याची माहिती समोर येतीये. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता देखील हवामान खात्याकडून [IMD] वर्तविण्यात आली आहे.
पुढच्या 5 दिवसात राज्यात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसांची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस असल्याची माहिती समोर येतीये. तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता देखील हवामान खात्याकडून
 [IMD]वर्तविण्यात आली आहे. जळगाव, नाशिक, धुळे, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम किनारपट्टीवर पुढील 4 ते 5 दिवस वेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य भारताच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असं आयएमडीकडून सांगण्यात आलंय. गुजरात किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता आहे.


अकोला जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहेय. या पावसाचा फटका सर्वाधिक अकोट आणि तेल्हारा तालुक्याला बसला आहे. या दोन्ही तालुक्यातील अनेक गावात पावसाचं पाणी शिरलं आहेय, तर शेत पीकाचही मोठ्या नुकसान झाल आहेय. तसंच अकोला शहरातील अनेक भागात पाणी साचलं असून किराणा मार्केट हे पाण्याखाली गेले आहे.

यवतमाळ शहरात अतिमुसळाधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे, सर्वच भागात नाले तुंबल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरून संसारोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे, बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी चिखल साचला आहे, लोक उघड्यावर आले असून अजूनही पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे यवतमाळकर नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

नांदेड जिल्ह्यातल्या पैनगंगेला पूर, टाकळी गावात एकाच कुटुंबातील तीन जण अडकल्याची माहिती मिळाली होती, मदतकार्यात अडचणी येत असल्याचं देखील दिसून आलं आहे. पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून इथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे

Post a Comment

0 Comments