Ticker

6/recent/ticker-posts

अ ब ब!!प्रवेश अर्जाची रक्कम,कोणाची मिळकत भक्कम?



कोणत्याही सरकारी खात्यात पद भरती  रिक्त असेल तर जाहिरात निघते व शेतु केंद्राच्या माध्यमातून त्या पदभरतीचा फॉर्म भरावा लागतो  फॉर्म फी  500-700 रू आहे . विद्यार्थी नोकरी मिळावी म्हणून सुसाट पणे कोणत्याही जाहिरातीच्या पदभारतीवर  फॉर्म भरतात

 

पद भरती पदे ५० आहेत संपूर्ण भारतातून फॉर्म भरले जातात. प्रत्येकालाच वाटते नोकरी लागली पाहिजे लाखो रुपये खर्च करून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कराव तरी काय असेही प्रश्न निर्माण होतो .

फॉर्म फी रु 500,
50 लाख ते 80 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात 

 सरकारचा फायदा पाहूया

 500 रुपये फॉर्म फी × 50,00,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला =
 (निव्वळ उत्पन्न फॉर्म फी पासून)
 2 अब्ज 50 कोटी

 50 जणांना नोकरी द्यावी लागेल
 पगार 25000 रुपये दरमहा गृहीत धरला जातो, तो जास्त मानला जातो पण तो तेवढा नाही.

 25000 × 50 लोक = 12,50,000 महिना

 12,50,000 × 12 महिने = 1 कोटी 50 लाख

 चाळीस वर्षे काम करत आहे
 1,50,00,000 × 40 वर्षे =  60 कोटी

 सरकारचे फॉर्म फी एकूण उत्पन्न =  2 अब्ज 50 कोटी रुपये 

 नियुक्त लोकांचा 40 वर्षांपर्यंतचा पगार
 60 कोटी रु

 2,50,00,00,000 - 60,00,00,000 =  1,90,00,00,000

 सरकारचे एकूण उत्पन्न = 1 अब्ज 90 कोटी

 माझा सरकार आणि विभागाला प्रश्न आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांना नोकऱ्या द्यायच्या आहेत की
 पैसे कमवायचे आहेत ?

देशाला लागला बेरोजगारीचा आजार, अर्ज भरतीच्या नावाने केला चालू शेअर बाजार ? 

 

Post a Comment

0 Comments