Ticker

6/recent/ticker-posts

शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मंगरुळपीर तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन

दिनांक १३.०७.२०१३ रोजी शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मंगरुळपीर तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन सांस्कृतिक सभागृह येथे करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता पासून ते ३ वाजेपर्यंत करण्यात आली असून
 या कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. खासदार भावनाताई गवळी, प्रमुख उपस्थितीत मा. चंद्रकांत दादा ठाकरे जि.प. अध्यक्ष वाशिम, श्री. राम मुळे मा. उपविभागीय अधिकारी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाकधने मंगरुळपीर पंचायत समिती सभापती रेखाताई भगत, उपसभापती राठोड तसेच विशेष निमंत्रीत मा. आमदार लखन मलिक यांचे सुपुत्र निखील मलिक तसेच ,न प चे मुख्याधिकारी शेवदा, साहेब,गटविकास अधिकारी मोहोड, साहेब,वन विभागाचे शिंदे साहेब, महावितरण चे जांभुळकर साहेब, पीएसआय शेंबडे साहेब, कृषी मंडळ अधिकारी चौधरी, एकात्मिक बाल विकास चे लुंगे साहेब, पंचायत समिती विस्तार अधिकारी वाढनकर साहेब,व विविध विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्य कक्षेतील कल्याणकारी योजनेचा पाढा वाचला. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सन्माननिय सदस्य आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका बचत गटांच्या महिला व सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सह रास्त भाव  दुकानदार हे उपस्थित होते. या कार्यक्रमा करिता विविध शासकीय योजनांची माहिती देण्याकरिता तसेच लाभार्थ्यांना शिबीरामध्ये थेट शासकीय योजनांचा लाभ देण्याकरिता मंगरुळपीर तालुक्यातील १६ शासकीय कार्यालयाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. शासन आपल्या दारी या शिबीराचे प्रास्तावित श्री. रविंद्र राठोड  तहसिलदार, मंगरुळपीर यांनी केले. तर संचालन दिलीप चौधरी व महल्ले यांनी केले. दिनांक १३.०७.२०२३ रोजी आयोजीत शासन आपल्या दारी शिबीरामध्ये १६ विभागाचे अधिकारी / कर्मचारी त्यांचे योजनांची माहिती घेऊन उपस्थित होते . या शिबीरामध्ये एकूण ४९२ लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आला असून तहसिल कार्यालयाचे १०७, लघु पाटबंधारे विभागाचे - ६, नगर परिषद, मंगरुळपीर - २४६, तालुका आरोग्य अधिकारी - ११, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी- १९, वनपरिक्षेत्र अधिकारी २, दुय्यम निबंधक, -१, बचत गट • ३ उमेद तर्फे २३ तालुका कृषी अधिकारी मंगरुळपीर यांचे कडून ५ ट्रॅक्टर व ४०० मिनी - कीट असे एकूण ८१५ लोकांना लाभ वितरण करण्यात आला.
शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात दि. १४.०६.२०२३ ते १८.०६.२०२३ या कालावधीत हर घर दस्तक या उपक्रमाअंतर्गत तलाठी, कृ. से. व ग्रा.से. यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन तालुक्याचे ११७ गावात व नगर परिषद क्षेत्रात मुख्याधिकारी, नगर परिषद, मंगरुळपीर यांचे तर्फे मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेत शहरी भागात ४२०० व ग्रामिण भागात ९३४५ असे एकूण १३५४५ कुटुंबांना भेटी देऊन सदर कुटुंबांना आवश्यक असलेले विविध प्रकारचे ८५०० दाखले वाटप करण्यात आले. तसेच महसुल मंडळ मुख्यालयी ६ ठिकाणी विशेष शिबीरे घेऊन त्या ठिकाणी सुध्दा लाभार्थ्यांना लाभ प्रदान करण्यात आला. योजना कालावधीत १४ एप्रिल २०२३ ते १२ जुलै २०२३ पर्यंत तहसिल विभागातून एकूण ३०१४२ लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले, संजय गांधी योजनेचे लाभ, मतदार कार्ड वाटप इत्यादी करण्यात आले. तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मंगरुळपीर यांचेकडून ३७९९९ लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आले. व कृषी विभागाकडून ८६०० लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आले. असे एकूण ७६७४३ लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत लाभ वितरण करण्यात आले.
 विविध विभागातील शासन आपल्या दारी सहभागी झालेले कार्यालय तहसील विभाग,
पंचायत समिती विभाग, नगरपरिषद विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र कामगार कल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, वन विभाग, सहकारी निबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, महसूल विभाग, पुरवठा विभाग , वीज वितरण विभाग, इत्यादींनी मोठ्या शिताफीने आपण करत असलेल्या कार्याचा गाजावाजा केला .
चंद्रकांत दादा ठाकरे जि.प. अध्यक्ष वाशिम, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,
खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता दीपप्रज्वलित करण्यात आले व त्यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यावर निश्चितच कारवाई केली जाईल अशी ही ताकीद दिली.
नंतर विविध क्षेत्रातील निवडक
लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

Post a Comment

0 Comments