Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर शहरात पावसामुळे चिखल व घाणीचे साम्राज्य न.प.च्या दुर्लक्षितपणामुळे रोगराई पसरण्याची भीती

साचलेल्या पाण्यामुळे मच्छर वाढले
शहर प्रतिनिधी इरफान शेख

मंगरूळपीर शहरातील विविध प्रभागांमध्ये  २१ व २२ जुलै रोजी मुसळधार पावसाने थैमान घातले, त्यामुळे शहरातील सकल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले • नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शहरातील अनेक घरात, परिसरात पावसाचे पाणी • शिरले अनेक प्रभागातून आंदोलनही करण्यात आली  मंगरूळपीर नगरपरिषद प्रशासनाद्वारे  क्षेत्रातील नाल्यांची सफाई न केल्याने  मुसळधार पावसाने न.प.ची पोल खोल केली परंतु याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागणार आहे. नाल्यांची घाण पाणी नागरिकांच्या घरात पोचल्यामुळे आता रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. नगरपरिषद क्षेत्रातील बायपास रोड, अशोक नगर, गवळीपुरा, चेहेलपुरा, दर्गा चौक, मंगलधाम हुडको कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ इत्यादी शहरात नाल्यातील घाणीचे पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येत असल्याने रोगराई पसरण्याची वाट न.प. पहात असल्याचा दिसत आहे नागरिकना त्रास सहन करावा लागला आहे .
सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था
स्वच्छता करता का कोणी स्वच्छता
 शहरात अनेक सार्वजनिक शौचालय आहे मात्र  गंदगी पसरलेली आहे सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था स्वच्छतेचा पता नही. स्वच्छ भारत अभियान च्या नावाने जाहिरातबाजी करून नगरपरिषदेने स्वच्छतेचे वाजवले तीन तेरा  
 हे फक्त घोषवाक्य एक कदम स्वच्छता की और दस कदम गंदगी की और

Post a Comment

0 Comments