"कारंजाच्या विकासाकरीता पुढाकार घ्यायला कुणीच पुढे येत नाही ?"
कारंजा ( प्रतिनिधी संजय कडोळे.)
जुन्या प्राचिन ऐतिहासिक,सांस्कृतिक कारंजा शहरातील सर्वच राजकिय पक्षातील कार्यकर्ते,सामाजिक पुढाऱ्यांच्या संवेदना पार हरविल्या असून,कारंजेकरांच्या विकासाकरीता कुणीच पुढे येतांना दिसत नसल्याचे भिषण वास्तव असल्यामुळे,सर्वसामान्य नागरीक बेजार झाला असल्याचे चित्र आहे.एखाद्या पावसाने गाजरगवत वाढावे त्याप्रमाणे केवळ निवडणूकीच्या काळातच राजकिय पक्षांचे,निवडणूक वचननाम्यात मिथ्या आश्वासनांची जाहिरनामे प्रसिद्ध होत असवात.एरवी मात्र कारंजाच्या विकासाशी यांना काहीही देणेघेणे नसल्याची वस्तुस्थिती आहे.एरवी केवळ वर्षानुवर्ष यांचे वाढदिवस, नियुक्त्या व सत्कार समारंभच सुरु असतात.सत्ताधारी राजकिय पक्षाला सळो की पळो करून सोडणारे ना इथे विरोधक आहेत. ना कारंजाचा विकास करण्याची जिद्द ऊराशी बाळगणारे विश्वासू नेते-कार्यकर्ते आहेत.आणि त्यामुळेच वर्षानुवर्षे या विधानसभा मतदार संघावर बाहेरचेच नेते येऊन राज करीत आहेत.आणि गावातील यजमान त्यांचे आतिथ्य पूर्वक चांगूलचालन करीत आहेत.आमदार म्हणून बाहेरचे पाहुणे उमेद्वारच,मतदार संघाच्या निर्मिती पासून वेळोवेळी निवडून येत आहेत.व कारंजेकरांच्या टाळूवरचे लोणी खात, बाहेरचे आमदार कारंजा कर्मभूमीचा सदुपयोग घेऊन,स्वतःच्या जन्मभूमीचा विकास करून, कारंजाच्या राजकारणावर स्वतःचा स्वार्थ बिनदिक्कतपणे साधून घेत आहेत.मात्र त्यांना ज्या कारंजा कर्मभूमीने, विधानसभेत, विधानपरिषदेत आमदार म्हणून मिरविण्या करिता, पद आणि मानसन्मान मिळवून दिला त्या मतदार संघाच्या विकासाकरीता कायम स्मृती आणि यांचे उपकार लक्षात राहतील असे एकही ठोस विकासात्मक कार्य करता येत नाही.ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. आज कारंजा शहरात ना उच्चपदवीधर किंवा डिप्लोमा शिक्षणाची कोणती व्यवस्था आहे ? ना कोणतेच शासकिय महाविद्यालय, ना सामाजिक न्याय भवन ? ना औद्योगीक वसाहत ? ना मोठे उद्योगधंदे ? ना येथे चांगले रस्ते ? ना कोणत्या आरोग्य व्यवस्थेच्या सोयी सुविधा ? प्रगती ऐवजी या ऐतिहासिक आणि एकेकाळीच्या धनाढ्य शहराची वाटचाल अधोगतीकडे सुरु आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही एवढे मात्र निश्चित. वास्तविक केन्द्र आणि राज्य सरकारात आपलेच शासन असल्याचा लाभ घेऊन,कारंजा विधानसभा मतदार संघाकरीता,येथील नागरीकांच्या कायम स्वरूपी विकासाची बरीच कामे करता येऊ शकतात.मात्र प्रत्येक वेळी स्थानिक आमदारांचा कल हा रस्ते दुरुस्ती, नाली बांधकाम आणि केवळ एखाद दुसरे सभागृह मंजूर करण्यावरच दिसून येतो. वास्तविक पहाता रस्त्यांची, सांडपाण्याच्या नाल्याची बांधकामे आणि सभागृह मंजूरी सारखी क्षुल्लक कामे ही स्थानिक पातळीवर असतात आणि ती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून दरवर्षीच करावी लागतात.त्यामुळे या चिल्लर कामांना विकासाची कामे म्हणून संबोधताच येणार नाही असे परखड मत,कारंजा येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय मधुकर कडोळे यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments