"भेटीप्रसंगी,गुरु गोरखनाथ आर्थिक विकास महामंडळ निर्मितीसाठी
शिफारस देऊन, विधानसभेत तारांकित प्रश्न मांडण्याबाबत केले आ.लखन मालिक यांनी आश्वासित."
कारंजा [लाड] :-नाथ समाजासाठी राज्यस्तरावर कार्य करीत असलेल्या,एकमेव अशा, वैदर्भीय नाथ समाज संघाचे अध्यक्ष एकनाथजी पवार यांचे कारंजा येथील निवासस्थानी, आकस्मिकपणे,वाशिम-मंगरूनाथ विधानसभा मतदार संघाचे, भाजपा पक्षाचे ज्येष्ठ आमदार लखनजी मलिक यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह अचानक सदिच्छा भेट दिली.यावेळी श्री. नृसिंह सरस्वती गुरुमाऊलीचेमुळे दर्शनार्थ कारंजा नगरीत नेहमीच यावेसे वाटते असे सांगताना, एकनाथजी पवार सारखी समाजसेवी माणसं आपल्या संपर्कात आहेत व जी समाजासाठी भरीव कार्य करतात. याचा खरंच अतिशय अभिमान आम्हाला वाटतो.असे त्यांनी प्रशंसोद्गार काढले.सोबतच वैदर्भीय नाथसमाज संघाने राज्य शासनाकडे केलेल्या गुरु गोरखनाथ आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी त्यांनी आपले शिफारस पत्र सुद्धा एकनाथजी पवार यांच्याकडे सुपूर्द केले व तुमच्या न्यायिक मागण्यासाठी आमचा पाठिंबा नेहमी राहील आणि विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात येईल .अशी ग्वाही त्यांनी या भेटीदरम्यान दिली. यावेळी त्यांचे सोबत वाशिम-मंगरूळनाथ विधानसभा प्रभारी धनंजयजी हेन्द्रे,जि प सदस्य चौधरी हे होते. तसेच यावेळी कारंजा येथील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना तालूका प्रमुख मंगेश पाटिल मुंदे, उपतालूका प्रमूख सुरेश तूरक, युवा सेना कांरजा मानोरा संपर्क प्रमुख चैतन्य पाटिल,युवा सेना शहर प्रमुख अजय मते पाटिल,उपशहर प्रमूख शूभम भोयर,हर्ष मिश्रा व कार्यकर्ते तसेच पिरीपाचे जिल्हा संपर्कप्रमुख विलास राऊत त्याचप्रमाणे दिव्यांग जनसेवक, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष,साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक,ज्येष्ठ लोककलावंत,गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या स्वागत समारोहाचे सुत्रसंचलन संजय कडोळे यांनी तर आभारप्रदर्शन एकनाथ पवार यांनी केले.
0 Comments