Ticker

6/recent/ticker-posts

आंदोलनापूर्वीच रस्ता दुरुस्तीला प्रारंभ शेख नावेद यांच्या प्रयत्नाला यश

मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक ते दर्गाह चौक हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्यात गेला असून या रस्त्याने ये जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात येईल असा आशयाची मागणी ऑटोरिक्षा युनियन अध्यक्ष शेख नावेद यांनी दि 26 जून रोजी न प मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली होती या रस्ता मागणीची दखल घेऊन दि.16 सप्टेंबर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे मागणीची दखल घेतल्याबद्दल निवेदनकते शेख नावेद यांनी मुख्याधिकारी यांचे आभार मानले शहरातील सुभाष चौक व दर्गाह चौक हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त अवस्थेत असून ये जा करणाऱ्या वयोवृद्ध व आजारी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे परिनामी नागरिकांना मणक्याचे आजारांना समोर जावा लागत आहे तर या रस्त्याने वाहने पूर्णत, खिळखिळी होत आहे. तसेच या रस्त्यावरून धार्मिक महोत्सवात साजरा करताना मिरवणूक काढली जाते यावेळी भाविकांना मोठा त्रास सहन लागतो तसेच या मार्गावर,माध्यमिक शाळा महाविद्यालय,या शाळा आहेत या शाळेतील विद्यार्थ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्यावर डांबरीकरण पॅचेजचे चे काम सुरू केले आहे या कामाची तत्परता लक्षात घेऊन नागरिकांनी आभार मानले रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देण्याकरिता ऑटो युनियन संघटना मंगरूळपीर यांनी पुढाकार घेतला होता

Post a Comment

0 Comments