Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर येथे विनय उपाध्ये एम.टेक .पदविने कुलपतीचे हस्ते सन्मानित .

अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड
कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर 
येथील विनय सुनील राव उपाध्ये यांचा नुकताच नागपूर येथे कुलपतीचे हस्ते एमटेक . डिग्री देऊन दिक्षांत समारंभात सन्मान केला आहे .
      वृत्त असे की कारंजा पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी पदावर  शिक्षण विभागात कर्तव्यावर
असलेले सुनील तुळशीराम उपाध्ये यांचा मुलगा विनय उपाध्ये यांनी पुणे येथे सिव्हील इंजीनीअर पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण नागपूर येथून एमटेक पोष्ट ग्रॅजूयेशन मेरीट श्रेणीत पूर्ण केले . त्यामुळे त्यांना नामविख्यात कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीसाठी आदेशीत केले असून त्यांनी मुंबई येथे आपली सेवा आरंभ केली आहे . त्यांचा नागपूर येथे दिक्षांत समारंभात कुलपतीने डिग्री देऊन  यथोचीत सन्मान केला आहे .वडीलाचे सततच्या प्रोत्साहनामुळे व आईच्या आशीर्वादाने जीद्य चिकाटीने अभ्यास करून आपणास सुयश मिळाल्याचे विनय माध्यमांशी बोलतांना म्हणाले . विनय एम. टेक पदवी घेतलेला काजळेश्वरातून पहीला युवक असल्याने गावच्या लौकिकात त्यांनी भर  घातल्याने त्यांच्या यशाचे कौतूक गावचे युवा सरपंच नितीन पा उपाध्ये ;माजी पंस सभापती सौ शिलाताई सुभाष पाटील उपाध्ये ; पं.स सदस्य रंगराव धुर्वे ;गट शिक्षणाधीकारी श्रीकांत माने ;महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्ञानप्रकाश विद्यालयाचे माजी प्राचार्य अशोकराव उपाध्ये ;माजी मुख्याधापक साहेबराव राऊत ;मो शरफोद्यीन ;नसीम शेठ पठान ; सहाय्यक गटविकास अधिकारी कैलासराव घुगे ;ग्रामविकास अधिकारी सतीश वरघट ;प्रहार सेवक प्रदीप उपाध्ये ;मनोज उपाध्ये ;योगेश उपाध्ये ;राजेश खडसे ;माजी जीप . अध्यक्षा सौ .ज्योती ताई गणेशपूरे ;माजी प्राध्यापक डॉ एकनाथ पा . उपाध्ये इत्यादी शिक्षण प्रेमी मंडळीनी गावकऱ्यांतर्फे केले असून त्यांचा यथोचीत सन्मान केला आहे .

Post a Comment

0 Comments