अकोला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्तेनी यावर्षीची दिवाळी कुष्ठरोगी ,फासेपारधी ,निराधार, दिव्यांग , वंचित लोकांसोबत साजरी करून त्यांना दिलासा देण्याचे काम केले .त्या
निमित्य या लोकांना थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेट, सोटर ,टोपी,नवीन कपडे ,दिवाळीचे फराळा व गोंळ जेवण देऊन या लोकांसोबत दिवाळी साजरी केली. समाजसेविका कमलजीत कौर यांचा वाढदिवस व दिवाळीनिमित्त या सर्व लोकांना या वस्तूचे वाटप करण्यात येऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली .यावेळी समाजसेवक गजानन हरणे यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते , केल्विन सुबी, नरेश सूर्यवंशी, नंदकिशोर गावंडे, कमलजीत कौर,समाधान वानखडे, जयदीप सोनकास्कर, प्रवीण ढगे, गजानन हरणे दिलीप तिहीले, गोपाल कावरे, राजेश फाले आदी सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व लोकांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना विविध भेट वस्तूचे वाटप करण्यात आले. व या लोकांच्या जीवनात आनंदाची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला.
हीरपूर येथील कुष्ठरोगी व फासेपारधी तसेच वणी रंभापुर येथील निराधार महिलांना ,अकोला शहरातील राज राजेश्वर मंदिर शनी मंदिर परिसरातील दिव्यांग तसेच तात्पुरता निवारा केंद्रातील निराधार लोकांन सोबत सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी करून दिवाळी पासून वंचित राहत असलेल्या या लोकांसोबत दिवाळीचा सण साजरा करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. खऱ्या अर्थाने दिवाळीपासून वंचित राहत असलेल्या घटकांची आनंदाची दिवाळी साजरी केली. त्यांच्या चेहऱ्यावर आलेला आनंदा मुळे सामाजिक कार्यकरते आनंदी झाले. व खरा दिवाळीचा आनंद घेतला.
0 Comments