मंगरूळपीर ता २३
मंगरुळपीर शहरातील क्रीडा संकुल परिसरात आज दिनांक 22 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा कार्यालय वाशिम व फील्ड आर्चरी असोसिएशन वाशिम जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने अमरावती विभागीय शालेय फिल्ड आर्चरी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली
या कार्यक्रमाचे उद्घाटन
सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांची उपस्थिती होती सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासुर यांनी दीपप्रज्वलन करून व स्पर्धेच्या ठिकाणी स्वतः तिर संधान करून विद्यार्थ्यांना संबोधित केले त्यानंतर स्पर्धेला रीतसर सुरुवात झाली या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एकूण 160 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला सदर विद्यार्थी हे अमरावती विभागातून अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यातून सहभागी झाले होते जवळपास चार तास ही स्पर्धा चालली या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा चौथा क्रमांक पटकाविला ह्या स्पर्धा 14 ,17, 19 या वयोगटातील मुले मुली फिटा कंपाउंड इंडियन या गटात खेळले सदर विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले सदर विद्यार्थ्यांचे गुणगौरव करून त्यांना मेडल तथा पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे ऊदघाटन सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी अपूर्वा बासुर यांनी केले तर कार्यक्रमात प्रमुख ऊपस्थिती तहसीलदार शितल बंडगर यांची होती तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता मंगरूळपीर तालुका क्रीडा अधिकारी किशोर बोंडे वाशिम तालुका क्रीडा अधिकारी सोनकांबळे क्रीडा अधिकारी फुपाटे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे एपीआय निलेश शेंबडे नगर परिषद चे कर निरीक्षक इंगोले पत्रकार नाना देवळे पत्रकार अशोक राऊत कैलास पाटील निलेश मिसाळ या कार्यक्रमाचे आयोजन फिल्ड आर्चरी असोसिएशनचे वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ उगले तथा सचिव नंदाताई उगले प्रशिक्षक अश्विनी गावंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन राम व्यवहारे तथा बक्षीस वितरणाचे संचालन पत्रकार अशोक राऊत तर आभार प्रदर्शन जगन्नाथ उगले यांनी केले आहे सदर स्पर्धेमुळे मंगरूळपीर शहरातील तमाम महाविद्यालयाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सदर प्रशिक्षण या मैदानात उपलब्ध केले असून सर्व स्तरातील विद्यार्थी विद्यार्थिनी महिला पुरुष सर्व गटातील खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन फिल्ड आर्चरी वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ उगले यांनी केले आहे विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच शहरात ही स्पर्धा झाली असून सदर खेळण्यासाठी ग्राउंड सुद्धा उपलब्ध झाले आहे
0 Comments