प्रा. दादाराव आत्माराम पाथ्रीकर यांचा ६१ वा वाढदिवस त्यामिनित्य त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या बद्दल काय लिहावे आणि किती लिहावे हा मलाच पडलेला यक्ष प्रश्न आहे. मी त्यांना महाविद्यालयात असल्यापासून तर अनेक आंदोलनात सोबत सहभागी होतो. जिद्दी, मेहनती, कर्तव्यदक्ष, मित्रांना मदत करत असतांना कधीही मागेपुढे विचार केला नाही. त्यांनी आपल्याला जे दुसऱ्यासाठी करता येईल ते सर्व करण्यात आपले आयुष्य पणाला लावून समाजकार्य केली व करत आहे . आजही ते सक्रिय राजकारणात ध्रुव तारा म्हणून परिचित आहे. सहकार क्षेत्रात अनेक अकोला जिल्ह्यातील नामवंत सहकार नेते याच्याकडे दादाराव पाथ्रीकर यांचे सहज वावरणे असे. परंतु त्यांनी त्यांच्या ओळखीचा स्वतःसाठी कोणताही लाभ घेतला नाही. मात्र कोणाचे काही काम अडले किंवा बिघडले तर त्यांनी ते कुठलाही आडपडदा न ठेवता करून दिले. ग्रामीण भागातील आरोग्य समस्या हा नेहमी चिंतनाचा विषय आहे. आपण ज्या गावातून येतो अशा अनेक दवाखान्याच्या समस्या आहेत. प्रसंगी रुग्णालयात उपचारासाठी अकोला येथे जावे लागते. अशावेळी दादाराव पाथ्रीकर नेहमी पुढे असत. रुग्णाच्या नातेवाईक यांना गाडी करून देणे, आर्थिक मदत मिळवून देणे, त्यांच्या सोबत असलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था करून देणे. उपचार खाजगी दवाखान्यात सुरू असतील तर डॉक्टर साहेब यांना भेटून बिल कमी करून देण्यात दादाराव पाथ्रीकर यांचा हात कोणीही धरू शकत नाही. आजही ते करत आहेत. लग्न असो, कार्य असो, वाढदिवस असो, निवडणूक असो एखाद्या घरातील प्रसंगी ते मदतीला धावून कोणत्याही विनंतीची वट नाही. अनेक लोकांना त्यांनी जात पात धर्म पंथ न पाहता आपत्कालीन परिस्थितीत गोरगरिबांना मदत केली आहे .दानशूर व्यक्तिमत्व असणारे पथरीकर
सर एक शिक्षक व समाजसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे दादाराव पथरीकर आहेत. त्यांनी त्यांच्या आवडीचे समाजसेवा हे क्षेत्र कधीही सोडले नाही. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या आर्थिक अडचणी त्यांनी आपल्या वेतनातून सोडविल्या परंतु त्याचा कधीही वाजगाचा केला नाही.
शैक्षणिक कार्यात रममाण असणारा शिक्षणयात्री हजारो विद्यार्थ्यांचे जीवनाला कलाटणी देणरा महात्माच ठरला असे म्हटले तरी वावगे ठरु नये.
रामायण, महाभारत, भगवतगिता, हरिविजय, भक्तीविजय यासारख्या अनेक धर्मग्रंथांचे वाचन, पठण करुन ते एक संतप्रवृत्तीचे समाज प्रबोधनकार ठरले आहेत. किर्तन, प्रवचन, रामकथेच्या माध्यमातून ते सातत्याने समाज प्रबोधनाचे कार्य करतात. मुक्या प्राण्यांविषयी त्यांच्या मनात एक वेगळा जिव्हाळा आहे. गोप्रेमी व श्वानप्रेमी ही त्यांनी नव्याने ओळख होत आहे. तसेच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी ते नेहमी अग्रणी असतात.
अनेक मानाचे सामाजीक व राजकीय पदे सरांनी उपभोगली आहेत त्यांनी अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आपले कर्तव्याची छाप सोडली. स्वामी विवेकानंतद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, शंभुराजे, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा ते आपल्या कृतीतून जोपासतात. त्यांच्या वाढदिवसाप्रती मनापासुन कोटी कोटी शुभेच्छा. आपल्या हातुन असेच सामाजीक, धार्मिक, राजकीय कार्य महाराष्ट्रात सतत घडत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना ! आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो वाशिम खबर महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी व चौधरी परिवाराच्या वतीने अनंत कोटी शुभेच्छा
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
जीवनात किती आराम केला, यापेक्षा किती कष्ट केले हे महत्त्वाचे असते.
किती आनंद मिळवला यापेक्षा किती समाधान मिळवले, हे महत्त्वाचे असते.
किती सुख मिळवलं, यापेक्षा किती दुःख सोसलं, हे महत्त्वाचे असते.
किती संपत्ती मिळवली, यापेक्षा किती माणूसकी मिळवली, हे महत्त्वाचे
0 Comments