सरोवर डाऊन असल्याने धान्य वाटपास अडचणी निर्माण होऊन त्यामुळे ग्राहक दुकानदारास शिवीगाळ व अरे रवी ची भाषा वापरतात . त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी या संदर्भात संघटनेने तहसिल कार्यालयास पूर्व सूचना दिली होती त्यामुळेई-पॉज मशीन जमा करून घेण्याची ठिनी संघटनेने केली आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील स्वस्त धान्याचे दुकानदार आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व स्वस्त धान्य दुकान मध्ये ई पॉश मशीन व्दारे धान्य वाटप करण्यात येतो सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणीकरणानंतर सन २०१८ पासून कार्ड धारकाला ई पॉश मशीन व्दारे धान्य वाटप करण्यात येते, अंदार २ महिन्यापासून धान्य वाटप करतांनी ई पॉश मशीनचे सर्वर डाऊन मशीन बंद बगेरे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या बाबत संघटणेने बरेच वेळा शासनाला निवेदने दिली आहेत. तसेच जिल्हाधिकारी साहेब, वाशिम व जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब, वाशिम यांना वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. सर्वर डाऊन असल्यामुळे व मशीन बंद असल्यामुळे कार्ड धारकांना मजूरी डुधवून दिवसभर ताटकळत दुकांना समोर धान्य घेण्यासाठी बसावे लागते. तरी सुध्दा त्यांना धान्य मिळत नाही. स्वस्त धान्य दुकानामध्ये भरपुर प्रमाणात धान्य साठा असुन सुध्दा कार्ड धारक धान्या पासुन वंचीत राहावे लागत आहे. या सर्व बाबीमुळे राज्य संघटणेने महाराष्ट्रातील सर्व ई पॉश मशीन तहसिल कार्यालयमध्ये जमा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.
प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी, धान्य आहे परंतु इंटरनेट नाही व सव्र्व्हरच्या अडचणीमुळे वितरण करता येत नाही, महागाईच्या इष्टांकांनुसार प्रती क्विटल ३००/- रुपये कमिशन देण्यात यावे, अशा प्रकारचे निवेदन निवासी तहसीलदार सातंगे साहेब यांना देण्यात आले आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन राऊत, उपाध्यक्ष सुधाकर चौधरी, सचिव निलेश पाटील , संघटनेचे पदाधिकारी
लाईक भाई अहमद, नारायण बाहेती,
श्रीमंत खांडेकर, एस आर चव्हाण, एम एस खान, छोटू बेग कादर बेग , रघुवंशी, सौ एस आर शिंदे, श्रीमती वनमाला पेंढारकर, आर जी हवा, डोंगरे, नवजीवन महिला बचत गट, ठाकरे, जाधव, बंग , सुर्वे, डवरे, येवले, पागधने, भोयर, चौगुले, तालुक्यातील इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . असलेल्या समस्येचे निवारण करा नाहीतर आमच्या मशीन जमा करा वाशिम जिल्ह्यातील सुध्दा संघटणेने तशा प्रकारचे निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयांना यापूर्वी दिलेले आहेत. निवेदन देताना तालुक्यातील सर्वच दुकानदार उपस्थित होते.
0 Comments