Ticker

6/recent/ticker-posts

मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांना लावणा येथील विहिरीत भ्रष्टाचार झाल्याचे निवेदन , श्रीकांत ढोले

 
चौकशी होणार की कागदी घोडे नाचवले जाणार!

ग्रामपंचायत लावणा येथे म.ग्रा.रो.ह.यो. च्या कामाचा जो देतो दाम त्याचेच होते काम करण्यात आलेल्या कामाची तात्काळ योग्य ती चौकशी करा. 


 रोजगार हमी यालाच म्हणतात अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही भ्रष्टाचाराचे अवलंबन, कायद्याचे उल्लंघन !
 

ग्रामपंचायत लावणा येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत लावणा येथे खोदकाम करण्यात  असलेल्या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात  भ्रष्टाचार झाला असून त्याचे मस्टर  शेतीचे गट नंबर बदलून त्याच शेतामध्ये जुनी विहीर असूनसुद्धा पैसे काढले आहे. व हि कामे रोजगारच्या मार्फत न करता जेसीबी मशीनद्वारे करण्यात आले आहे. याबाबतचे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहे. ह्या विहिरी नियमबाह्य पद्धतीने केल्या गेल्या असून अशा सर्व झालेल्या रोजगाराच्या जॉब कार्ड व नाव गाव पत्यासह चौकशी करण्यात यावी व चौकशी दरम्यान दोशी  असणाऱ्या विरुद्ध देण्यात आलेल्या रकमेची वसुली करून  फौजदारी  गुन्हे दाखल करण्यात यावे . या बाबत चौकशी करून सबंधितांवर दंडात्मक व निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. रोहयोच्या कामामध्ये भयंकर स्वरूपाचा भ्रष्टाचार झालेला असून सर्वसामान्याची यामध्ये लुट करण्यात आली व शासनापासून लाखो रुपयाचा निधी हडप करण्यात आलेला आहे.

तरी आपण सर्व कामाची योग्य चौकशी करण्यात यावी व आपल्या स्तरावर  अधिकारी व विस्तार अधिकारी यांना ग्राम सचिव यांनी संगणमत करून प्रस्ताव पारित केले या सर्व बाबीची चौकशी व्हावी व ज्या विविध योजना मधून विहिरी मंजूर केल्यात त्यांच्या मुळ दस्त ऐवजांची चौकशी व्हावी व सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी घेऊन निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. व त्यांची योग्य चौकशी करण्यात यावी त्या चौकशी मध्ये काही खोटी चौकशी आढळून आल्यास आत्मदहन करण्यात येईल. असे निवेदन सादर करण्यात आले आहे . वरिष्ठ अधिकारी सखोल चौकशी करून दंडात्मक कारवाई करतील का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments