Ticker

6/recent/ticker-posts

अजितदादा गटाला धक्का, डहाकेंना विधानसभेचे तिकीट?

          वारे राजकारणाचे
जयंत पाटील करंजा विधानसभा दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. दिवंगत आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या पत्नी कारंजा बाजार समितीच्या सभापती असून त्या सध्या राष्ट्रवादीत अजित पवार गटात आहेत. मंत्री दिलीप वळसे पाटील हे डहाके कुटुंबीयांचे जावई आहेत. जयंत पाटील यांनी डहाके कुटुंबीयांची भेट घेऊन बंद दारआड चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून सईताई डहाके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांची जयंती असून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आलो होतो, असे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.बंद दारआड चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण

Post a Comment

0 Comments