मंगरुळनाथ:--
शहरामध्ये दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही शहरांमधील कावड मंडळाच्या वतीने उत्स्फूर्पणे पवित्र श्रावण महिन्यात तिसऱ्या श्रवण सोमवारी कावड यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरामध्ये कावडधाऱ्यांनी सकाळीच पवित्र जलकुंडातून जल आणले. कावड यात्रा शहरामध्ये येताच "जय भोले" "हर हर महादेव"च्या जय घोषाने कावड यात्रेला सुरुवात झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी ही भव्य कावड यात्रा पाहण्यासाठी, मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
शिवभक्तांचा उत्साह आणि वाद्यांच्या गजरात "जय भोले", "हर हर महादेव" जय घोषाने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.यावेळी लहान चिमुकल्या शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कावड यात्रा चे शहरांमध्ये ठिक ठिकाणी भक्तांच्या वतीने पुजन करण्यात आले. तसेच शिवभक्तांना चहा, पाणी, नाष्टा, फळ, खिचडी, बुंदी, पुरी, चहा, एवढेच नव्हे तर मठ्ठ्याचे सुद्धा आयोजन केले होते आदींचे वाटप करण्यात आले.
श्री सोमनाथ पंचवटी संस्थान येथे सकाळी, लहान मुलांची कावड यात्रा चे आगमन शेवटी कावड पालखी ठीक ठिकाणी शिव मंदिरात पोचवून महादेवाला जलाभिषेक करण्यात आले. व त्यानंतर ही कावड यात्रा संपन्न झाली. या कावळ यात्रा सोहळ्यामध्ये हर हर महादेव कावड मंडळ, मठ मोहल्ला, राज राजेश्वर कावड मंडळ, जाणता राजा कावड मंडळ, पाताळेश्वर कावळ मंडळ, गुरुध्वज कावळ मंडळ, इत्यादींनी कावळ यात्रेमध्ये सहभाग घेतला होता. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत नाथ नगरीतील सर्व कावड मंडळाचे श्री सोमनाथ पंचवटी नंद नंदिकेश्वर संस्थान येथे स्वागत करण्यात आले यावेळी आदित्य ललित पाटील, भानुदाजी रेडेकर, जय बियाणे, मंगरूळ येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ सुरेखाताई संजू वाडे ,सुनिता ललित अनेकर पाटील, सौ दिपाली राजेश गिरडेकर , सौ जयश्री किरण गिरडेकर, सौ उज्वला सुधाकर चौधरी, रंजना बबनराव बोरकर , गायत्री बबनराव बोरकर , कल्पना प्रशांत झंझाड , ललिता दिगंबर शिंगणे, अश्विनी सुनील भोयर , चंदा भानुदास गिरडेकर , सौ रुपाली जय बियाणी, सारिका हरीश बियाणी , अवंतिका गिरडेकर , प्रणिता गिरडेकर , कविता ठाकरे, इत्यादी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यावेळी शहरामध्ये पोलीस प्रशासनाचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आळे त्यांच्या यंत्रणेने खूप मोठे मोलाचे सहकार्य केले
0 Comments