मंगरूळनाथ :--
श्री राजपूत करणी सेना महाराष्ट्र युवा संघटन श्री राजपूत करणी सेना कार्यकर्त्या संमेलन पदाधिकारी नियुक्ती चा कार्यक्रम संत बिरलनाथ महाराज मंदिर येथे दिनांक 18 रोजी उपस्थित मान्यवर समाज बांधवांच्या उपस्थित संपन्न झाला.व यामध्ये राजपूत करणी सेना मंगरूळनाथ तालुका अध्यक्ष पदी संजय सिंह ठाकूर यांची तर शहर अध्यक्षपदी दर्शन रघुवंशी यांची महाराष्ट्र कार्य कारिणी राजपूत करणी सेना यांच्या पत्रद्वारे नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
त्याच प्रमाणे
तुषार मनोजसिंह रघुवंशी उपशहर अध्यक्ष, नीरज गोपालसिंह रघुवंशी सहसचिव, सिद्धांत दिलीपसिंह रघुवंशी सदस्य, सुदर्शन संजय सिंह रघुवंशी सदस्य, हरी ओम विशाल सिंह रघुवंशी सदस्य, शुभम दीपक सिंह रजोदिया सदस्य, सुजल रवी सिंह रघुवंशी सदस्य, विर नरेशसिंह रघुवंशीसदस्य, सोहम धर्मेंद्र सिंह रघुवंशी सदस्य,आकाश गजानन सिंह रघुवंशी सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली.
यावेळी शहरामध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आले. व भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर, वाशिमचे ज्येष्ठ समाज भूषण किसन सिंग चंदेल,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष क्षत्रिय अखिल भारतीय महासभा लखनसिंह ठाकूर, समाज सेवक रवींद्रसिंह ठाकूर, युवती महिला कार्याध्यक्ष नंदादीदी राजपूत, महाराष्ट्र मुख्य सचिव गुलाबसिंह परदेशी, महाराष्ट्र युती महिला कार्याध्यक्ष कांचन दीदी ठाकूर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष करणी सेना काशिनाथ सिंग ठाकूर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष करणी सेना धरमसिंग ठाकूर विदर्भ अध्यक्ष करणे सेना ललिता सिंह परिवार महाराष्ट्र प्रदेश करणी सेना विधी सल्लागार श्री भारत जयप्रकाश सुधी युवा विदर्भ अध्यक्ष दादा ठाकूर जिल्हाध्यक्ष वाशिम सावंत सिंग ठाकूर राजपूत करणी सेना नांदेड मराठवाडा युवा अध्यक्ष निलेश ठाकूर हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष राजपूत दारासिंग विठ्ठल सिंग परभणी जिल्हा कार्याध्यक्ष भारत संभाजी मोरे राणा सक्रिय करणी सैनिक सुनील वाघ, अकोला, वाशिम, परभणी, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, आदी ठिकाणाहून आलेले मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
लखन सिंह ठाकुर यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की समाजा बरोबर राजपूत समाजाला राजकीय पटलावर समाज एकजूट होणे आवश्यक असून समाजा च्या एकीकरणामुळे समाजातील राजकीय व्यक्तींना पाठबळ देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली व समाजाने आपल्या राजपूत समाजातील राजकीय व्यक्तींमागे येणाऱ्या विधानसभा व इतर निवडणुकांमध्ये समाजातील राजकीय व्यक्ती मागे एकजुटीने उभे राहून आपली ताकद दाखवून देण्याची गरज आज निर्माण झाली आहे. असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम सिंह ठाकूर यांनी राजपूत करणी सेना चे कार्य यावेळी विस्तृतपणे विशद केले. व राजपूत करणी सेना द्वारे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी संघटना असल्याचे त्यांनी सांगितले. व समाजातील नवयुकांनी पुढे येऊन व हे कार्य अविरतपणे सुरू ठेवावे व ज्येष्ठांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. आपल्या समाजातील विविध पक्षात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या मागे समाजाला विकास कार्यात मदत होण्यासाठी आपल्या समाजातील राजकीय व्यक्तींमागे ठामपणे उभे राहण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर उपस्थित इतर मान्यवरांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन अमोल रघुवंशी यांनी केले. तर दर्शन रघुवंशी यांनी आभार मानले.
या वेळी मंगरूळनाथ सकल राजपूत समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments