Ticker

6/recent/ticker-posts

"हर हर महादेव"च्या जय घोषाने गजबजली आदर्श ग्राम वनोजा नगरी


गजानन राऊत वनोजा 
ता. १९
वाशिम जिल्ह्यातील आदर्श ग्राम वनोजा येथे दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ वनोजा यांच्या वतीने पवित्र श्रावण महिन्यात तिसऱ्या श्रावण सोमवारी कावड यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कावडधाऱ्यांनी सकाळीच  पुर येथिल पुरातन शिव मंदिरा जवळील कुंडा मधुन जल आणले. कावड यात्रा गावात येताच जय भोले हर हर महादेवच्या जय घोषाने कावड यात्रेला गावात सुरुवात झाली. परिसरातील नागरिकांनी ही भव्य कावड यात्रा पाहण्यासाठी, मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शिवभक्तांचा उत्साह आणि वाद्यांच्या गजरात "जय भोले", "हर हर महादेव" जय घोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी लहान चिमुकल्या शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कावड यात्राचे गावात ठिक ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने पुजन करण्यात आले. तसेच ग्रामस्थांच्या वतीने शिवभक्तांना चहा, पाणी, नाष्टा, फळ वाटप करण्यात आले. पालखी गावातून शिवमंदिरा जवळ आल्यावर वरुणराज्याने हजेरी लावली, त्यामुळे शिवभक्तांमध्ये अजून, उत्साह वाढला होता. शेवटी कावड पालखी शिवमंदिरात पोचवून महादेवाला जलाभिषेक करण्यात आला. या सोहळ्यासाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ वनोजा, जय मल्हार मित्र मंडळ, गोर सेना मित्र मंडळ च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेत ही कावड यात्रा यशस्वी संपन्न केली.

Post a Comment

0 Comments