अकोला.............................. स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथील वारकरी व समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जणआंदोलन, मराठायोद्धा वारकरी गजानन ओंकारराव हरणे यांना श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यामध्ये सेवा दिल्याबद्दल शाल श्रीफळ नारळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित गौरवण्यात आले. . अकोट येथील श्रद्धासागर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह भ प वासुदेवराव महल्ले महाराज , प्रमुख उपस्थिती म्हणून ह भ प अंबादास महाराज मानकर, उपाध्यक्ष माधवराव ठाकरे, सचिव पुरुषोत्तम लाजूरकर , कोषाध्यक्ष, रवींद्र वानखडे, विश्वस्त अशोक पाचडे, अनिल कोरपे, गजानन दुधाट, पुरुषोत्तम मोहकर, नंदकिशोर झांमरे,व्यवस्थापक अमोल मानकर, यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होते.गजानन ओंकार हरणे यांनी केलेल्या त्यांच्या पस्तीस वर्षाच्या कार्या काळामध्ये सामाजिक बांधिलकीने सेवाभाव वृत्तीने निस्वार्थपणे केलेल्या समाजकार्याबद्दल व त्यांनी पैदल वारी पालखी सोहळ्यामध्ये 25 दिवस पाई चालून निस्वार्थपणे सेवाभाव वृत्तीने सेवा दिल्याबद्दल त्यांचा गौरव विठ्ठल रुक्माईची मूर्ती, सनमानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले .गजानन हरणे हे गेल्या 35 वर्षापासून अकोला जिल्ह्यात विविध धार्मिक सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब, दिन दलित, दिव्यांग, वंचित लोकांसाठी समर्पण भावनेने त्याग वृत्तीने निस्वार्थपणे काम करीत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, श्याम मानव, मेघा पाटकर आदी सत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज शाहू ,फुले ,आंबेडकर , शिवाजी महाराज,गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांचे विचार घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत. आजपर्यंत माहितीचा अधिकार, लोकपाल विधेयक व जनहिताचे विविध 11 कायदे व्हावे म्हणून सोळा वेळा आमरण उपोषण केलेले आहेत.तसेच मराठा आरक्षण मिळावे म्हणून सतत 9 दिवस अन्नत्याग आंदोलन करून मराठा समाजासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे. स्थानिक प्रश्न समस्या व भ्रष्टाचाराच्या विरोधात सुद्धा अनेक उपोषणे आंदोलने केलेली आहेत.तसेच अण्णा हजारे यांच्यासोबत अनेक भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन मध्ये 14 दिवस आमरन उपोषण जन लोकपाल कायद्यासाठी लढा दिला आहे.त्यांच्या या समर्पित त्याग भावनेने काम करण्याच्या समाज कार्याची दखल घेऊन आज पर्यंत शंभरच्या वर पुरस्कार भारत सरकार, राज्य शासन ,विविध सामाजिक संस्था धार्मिक संघटनेच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले आहे. नुकताच दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमी यांच्यावतीने 39 व्या राष्ट्रीय दलित साहित्यकार सामाजिक संमेलनात दिल्ली येथे गजानन हरणे यांना सन्मानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवार्ड देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते गौरवण्यात, सन्मानित करण्यात आले. तसेच यावर्षीचा मराठाभूषण पुरस्काराने सुद्धा ते सन्मानित झाले आहेत. व अकोला भूषण पुरस्कार हा प्रतिष्ठेचा मानाचा सन्मान यावर्षी त्यांना मिळाला आहे. तसेच यावर्षी 2024 चा समाजकारण संघर्ष पुरस्कार समाजसेवक गजानन हरणे यांना या वर्षात पाच पुरस्कार मिळाले असून हे पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध सामाजिक संस्था, संघटनेचा वतीने आनंद व्यक्त केला जात असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊन श्रद्धासागर येथे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थ अकोटच्या वतीने त्यांचा सन्मान गौरव सत्कार करण्यात आला. त्यांच्या या सत्काराबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या गौरव समारंभ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ समाजसेवक ,सामाजिक कार्यकर्ते, विविध धार्मिक, सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी कीर्तनकार, प्रवचनकार, श्री संत वासुदेव महाराजांचे भक्त , वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments