Ticker

6/recent/ticker-posts

अबब....! आदर्श ग्राम वनोजा येथील व्यापारी संकुल मध्ये प्रगटला अंदाजे ११ फुट लांब अजगर..... हेल्पिंग हॅण्ड च्या सर्पमित्रांनी दिले जीवदान.....


"वन्यप्राण्यांच्या सोबतच आता सरपटणारे साप वर्गीय हिंस्र प्राणी सुध्दा आता माणवी वस्तीकडे धावताहेत!"
 

वनोजा (दि.१३/०८/२४)
गजानन राऊत  
मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील आठवडी बाजार चौकामधील ग्राम पंचायत चे व्यापार संकुल जवळ दिनांक १२/०८/२४ सोमवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजे दरम्यान एक मोठा साप नागरिकांना दिसून आला. एवढा मोठा साप पाहून नागरिकांची तारांबळ उडाली.याची माहिती एम एच २९ हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड ऍडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिम चे जिल्हाध्यक्ष-आदित्य इंगोले तसेच सदस्य-शुभम हेकड व प्रविण गावंडे यांना मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.गावात मोठा अजगर आला ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि अजगराला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली.
               
  सदर ठिकाणी पाहणी केली असता एक मोठा अंदाजे ११ फूट लांब अजगर त्यांना आढळून आला.यांनतर संघटनेच्या सदस्यांनी संबधित माहिती उपवनसंरक्षक-अभिजीत वायकोस तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी-अमित शिंदे,वनपाल-सुदर्शन सोनवणे व वनरक्षक-मनिष हुमने यांना दिली.यांनतर कारंजा - मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकरी-अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक-शुभम हेकड,प्रविण गावंडे व आदित्य इंगोले यांनी मोठ्या शिताफीने अतिशय तापट स्वभावाच्या अजगराला सुरक्षित रित्या रेस्क्यू केले.या अजगराची लांबी अंदाजे ११ फूट व वजन अंदाजे १७ते१८ किलो होते. यांनतर वनपाल-सूदर्शन सोनवणे व वनरक्षक-मनिष हुमने यांच्या मदतीने सदर अजगराचा योग्य तो पंचनामा करून त्याला रात्रीच निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले. गावातील रहदारीच्या चौकात चक्क अजगर घुसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. एम एच २९ हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड ऍडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिम च्या सदस्यांनी आठवडाभरात दिवसांत वनोजा परिसरातील तिन अजगरांना पकडुन जंगलात सोडत जीवदान दिले.त्यांच्या साहसी व धाडशी आणी सामाजीक कार्याबद्दल जनसामान्यांकडुन सर्व चमुंचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments