मंगरूळनाथ तालुक्यासह जिल्ह्याभरात दिनांक 01/ 02 सप्टेंबर ला अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीचे छायाचित्र, चिञफित, समाज माध्यमातून प्रसिद्ध होऊ लागल्या, प्रचंड प्रमाणात वर्तमान पत्रात सुध्दा बातम्या प्रसिद्ध झाल्या अतिवृष्टी ग्रस्ताचे अर्ज,निवेदन देण्यात येऊ लागले. समाज माध्यमांवर तर सगळीकडे छायाचित्र व चिञफितीने धुमाकूळ घातला होता. शेतक-राच नुकसान निश्चितच झाल होत. यात शंकाच नाही. आणी म्हणूनच राज्य सरकारने झालेल नुकसान, नुकसानीची तीव्रता, जनतेच्या भावना लक्षात घेता, प्रशासनाला आदेश दिले. की नुकसान भरपाई देताना कोणावरही अन्याय होणार नाही.कोणताही शेतकरी नुकसान भरपाई देतांना वंचित राहू नये. ज्याच नुकसान झाल नाही, तो पाञ झाला तरी चालेल पण ज्याच खरोखरच नुकसान झाले आहे तो माञ सुटता कामा नये. तो वंचित राहता कामा नयेत. याची काळजी म्हणून राज्य सरकार ने कुठल्याही शेतक-राचे बांधावर जाऊ नका! कोणताही सर्वे करू नका! कोणालाही कोणते कागद मागू नका! त सर्व शेतक-याना मागणी नसतांना ही सरसकट नुकसान भरपाई चे आदेश काढले!
कुठलाही भेदभाव नाही! कोणतीही अट नाही. कोणतीही पाहणी नाही. कोणताही सर्वे नाही. कोणताही अधिकारी, कर्मचारी याचा अहवाल नाही. शेतक-राला कोणताही अर्ज विनंती करायची नाही. उदार मनाने! साफ हेतूने! निष्पक्ष! चांगल्या हेतुने!
राज्य सरकार ने अतिवृष्टी ग्रस्ताना नुकसान भरपाई जाहीर केली.
अस शेतक-याच झाल! न मागता मिळाल्यावर आनंद होणारच ना! मग सगळे शेतकरी खुष
त्याना वाटल अतिवृष्टी झाली! नुकसान झाल! राज्य सरकारन नुकसान भरपाई जाहीर केली. आपल्याला काही मुद्दा राहीला नाही. लोकांची माथी कशी भडकाव! लोकात संभ्रम कसा निर्माण कराव! अतिवृष्टीच राजकारण कस कराव! राज्य सरकार विरोधात लोकांना भ्रमित कस कराव! राज्य सरकार विरोधात रोष निर्माण कसा होईल! समोर विधान सभा निवडणूक आहे. त्यात अतिवृष्टीचा मुद्दा उपस्थित कसा कराव!
* शेतक-याना राज्य सरकार विरोधात चिथावणी कशी दयाव! सरकारला बदनाम कस कराव! या चिंतेत वाशिम जिल्ह्यातील विरोधी पक्ष होता.
* वरील कोणतीच गोष्ट आपण राज्य सरकार विरोधात करू शकत नाही. कारण राज्य सरकार ने न मागता शेतक-याना सरसकट नुकसान भरपाई जाहीर, आणी ती जाहीर केल्या केल्याप्रमाणे शेतक-याना मिळणार पण आहे. त्यामुळे शेतक-याचा फायदा होईल! मग शेतकरी खुष होतील! पण आपल काय ‼ आपला काय फायदा होणार ‼ मग विधान सभेत आपल्याला मते कशी मिळतील ⁉ आपल काही खर नाही ‼ आपली तर वाट लागेल ‼
* मग वाशिम जिल्ह्यातील विशेषता मंगरूळनाथ तालुक्यातील विश्व प्रवक्ते * स्वयंघोषित प्रसिद्धीप्रमुख
जसे मागील खासदार ला खुश करण्यासाठी कायम पदवी देऊन खुष करण्याचा प्रयत्न करायचे आजही तेच तेच कार्यकर्ते तेच फंडा वापरून खासदाराना चुकीची माहीती, खोट नाट सांगून! दिशाभूल करून प्रकाशात राहण्यासाठी सगळी धडपड सुरू आहे.
कारण आता अतिवृष्टीचा भागाचा दौरा करण्यासारख, पाहण्यासारख, नुकसान भरपाई मागण्यासारख काही राहलच नव्हत! लोकांची काही मागणीच नव्हती! कारण न मागता जर मिळत असेल तर विनाकारण देणाऱ्याला ञास कशाला द्यायचा एवढ शेतक-याला चांगल समजतं! भलेही राजकारण्यांना समजत नसेल! पण.............
* कोणत्याही गोष्टीच राजकारण करण्याची सवय झालेल्या! नव्हे आजार झालेल्या विरोधीपक्षाला शांत कस राहिल्या जाईल!
* आणी त्याचे विश्व प्रवक्ते त्यांना शांत कसे बसू देतील!
* तसेही त्यांना माहीत होतच!
* राज्य सरकार ने सरसकट नुकसान भरपाई जाहीर केलीच आहे. ती निवडणूकी पुर्वी शेतक-याना मिळणार आहेच! आणी त्याच श्रेय हे राज्य सरकार लाच मिळणार हे ही ठरलच! मग आपल काय ‼
* विरोधकाच सर्वात मोठ दुखण हे होत! आणी म्हणूनच शेतक-याना मिळणा-या नुकसान भरपाईच श्रेय आपल्याला मिळाव यासाठी केलेला हा सगळा खटाटोप!
म्हणजेच खासदाराचा अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता!
हे समजण्या एवढी जनता व शेतकरी अडाणी, अज्ञानी, व मुर्ख नक्कीच नाही!
तस ही आपण विरोधी पक्षाचे खासदार आहात!
* आणी आपण लोकसभेचे खासदार असल्यामुळे संसद सदस्य असल्यामुळे आपण लोकसभेत उपद्रव करू शकता
हे सरळ सरळ आहे.
* राज्य सरकार आपल नाही! ते आपल ऐकणार पण नाही! हे ही सत्य आहे! उपमुख्यमंञी अजित पवार तर अजिबातच नाही!
* कारण विरोधीपक्षा च्या खासदाराला केंद्रात किती महत्व दिल जात हे 2004 ते 2014 पर्यंत विरोधी पक्षाच्या खासदार असलेल्या भावना गवळी सरकारची विरोधी पक्ष खासदारा सोबत ची पक्षपाती वागणूक आवर्जून नेहमी सांगायच्या! त्यामुळे आपण केलेला अतिवृष्टी पुर ग्रस्त भागाचा पाहणी (दौरा) इव्हेंट राज्य सरकार ने किती गंभीर पणे घेतला‼हाही संशोधनाचा विषय‼
* हे आपल्याला पण चांगल माहीती, चांगली कल्पना आहे पण काय करणार काय ⁉
कारण तुम्ही राजकारणी आणी तुमच क्षेत्र राजकारण!‼
पण जनतेसोबत पण राजकारण‼
आणी हो तुमच्या अतिवृष्टी इव्हेंट मध्ये स्थानिक नागरिक व शेतकरी किती?
हेही पहाव! कारण तुमच्या वाड्याच्या खासदार याचे सोबत यवतमाळ जिल्ह्य़ातील नेते, पदाधिकरी, कार्यकर्ते!
शिवाय वाशिम जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते! व सैनिक किती हे मोजले तर !!
बर हा पाहणी इव्हेंट कुठ फक्त शिवणी रोडवर!का? इतर भागात नुकसान झाले नाही? का शिवणी हे गाव अमरावती वाशिम महामार्गावर आहे म्हणून‼दळण वळणाला सोईच! व्हि आय पी वाहन उभी करायला सोप! पाहायला सोईच! रोडच्या रोडवर शेतकऱ्याच्या बांधावर जायचं काम नाही !
लघु पाटबंधारे विभागाच्या आशीर्वादाने
रहित रस्त्या लागून असलेल्या शेतकरी गंगाराम पाटील यांचे गेली पाच वर्षापासून सारखे नुकसान होत आहे. जिल्हाधिकारी असो की तहसीलदार असो आमदार खासदाराचा तर सोडाच
नेहमी विरोधी पक्ष शिवणी रोडवरच का जातो! आणी दौरा करतो! इव्हेंट करतो! हा प्रश्न ⁉ जनतेला पडत आहे!!
हे आपल्या ही लक्षात येईल!
का श्रेय, प्रसिद्धी, प्रकाशझोतात राहण्यासाठी केलेला खटाटोप!
का निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली केविलवाणी धडपड!
हे निवडणूकी नंतर लक्षात येईलच!
जनताही निवडणूकीत याच उत्तर देईलच!
अण्णाभाऊ चौधरी चेहेल वाशिम
0 Comments