पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान; सामाजिक कार्याची घेतली दखल
मंगरुळपीर : सुधाकर चौधरी
मंगरुळपीर शहरातील सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नगरसेवक तथा गटनेते मा. गणेशभाऊ लक्ष्मीबाई रामचरणजी खोडे यांचा संत श्री सेवालाल महाराज युवा प्रतिष्ठान, मंगरुळनाथ यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गणेशभाऊ खोडे हे केवळ पदापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्याचे यावेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. सामाजिक बांधिलकी, जनतेशी असलेला जिव्हाळा आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या गणेशभाऊ खोडे यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सत्कार करण्यात आल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
सत्कार स्वीकारताना गणेशभाऊ खोडे यांनी संत श्री सेवालाल महाराज युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. समाजासाठी काम करण्याची प्रेरणा अशा सन्मानातून अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संत श्री सेवालाल महाराज युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
0 Comments