Ticker

6/recent/ticker-posts

य.च. महाविद्यालयात स्व कोकीळाबाई ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त रोगनिदान शिबिर संपन्न

  मंगरूळपीर दिः 20 सप्टेंबर 2024 रोजी मातोश्री स्वर्गीय कोकिळाबाई सुभाषराव ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून  विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी रोगनिदान शिबिर व औषधी वाटप करण्यात आले आहे.श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा संस्थेचे सचिव तथा वाशीम जि.प. अध्यक्ष मा. चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
  सर्वप्रथम कार्यक्रमात स्व.कोकीळाबाई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सूर्यकांत कान्हेरकर, अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. दिलीपराव ठाकरे, डॉ. धनश्री जाधव तालुका वैद्यकीय अधिकारी, उपस्थित होते. तसेच मंगरूळपीर ग्रामीण रूग्णालयातील ,डॉ. प्रिती तिडके मँडम,डॉ. विनोदराव श्रीराव,,डॉ. सादिक शेख,डॉ. फारूकी सर,डॉ. रमेश आडे,डॉ. अश्विन गोडबोले, फार्मासिस्ट ,आरती मकेसर,श्री. प्रकाशभाऊ संगत ,आरोग्य सेवकश्री. प्रदीप घाटे श्री.विलास राठोड ,अधिपरिचारिका शालिनी प्रधान, सुनिता ठाकरे ,फार्मासिस्ट आरती मके सर,संदीपा श्रुंगारे आरोग्य सेविका, इंदुताई सुर्वे  यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय कावरे यांनी केले.
त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात.तसेच औषधीचे वाटप करण्यात आले. यासाठी  ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर,परिचारिका यांनी आपली सेवा दिली.त्याबद्दल महाविद्यालयातर्फे सर्व आरोग्य अधिकारी व परिचारिका यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. .या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर प्रा. गावंडे सर, प्रा. कावरे सर, प्रा.डॉ. मधुकर ताकतोडे रा.से.यो अधिकारी,प्रा.जितेंद्र सुर्वे सर, प्रा.कडू मॅडम प्रा. आखरे सर प्रा. अलोने सर ,प्रा. दोडेवार सर प्रा.निखिल भगत सर,प्रा.वकील खान,प्रा.कांबळे, राजु आवारे सुरेश कंकाळ,तसेच महाविद्यालयातील  शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments