Ticker

6/recent/ticker-posts

लघु पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी गंगाराम चौधरी यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान

नदीचे पाणी डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतात गेली पाच वर्षापासून नुकसानच नुकसान 

मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम चेहेल येथील शेतकरी गंगाराम चौधरी यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान लघु पाटबंधारे विभागाने निष्कृष्ट दर्जाच्या पुलाचे बांधकाम केले वारंवार तक्रारी देऊनही गेल्या चार वर्षापासून सतत पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे एकतर सोयाबीनला हमीभाव नाही त्यात अशे नुकसान शेतकऱ्यांनी कराव तरी काय हा प्रश्न  परिसरातील शेतकऱ्यांना
 निर्माण होत आहे .मागील वर्षी गंगाराम चौधरी यांच्या शेतात उसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 
 वीर जमीन दोस्त झाली होती दोन मोटर पंप सहा विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची भरपाई अद्यापही दिली नाही .
लघु पाटबंधारे विभागाने. महसूल विभागाने आपले घोंगळे झटकत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले 
यावर्षीही पावसाने त्यांचं शेतात  सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . लघुपाटबंधारे विभागाचा भोंगळा कारभार व ठेकेदारासी हात मिळवली करून आपले उखळ पांढरे केले आहे. गेली अनेक वर्षापासून शेतकऱ्याला न्याय न मिळाल्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मॅडम शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वेळ मिळेल का अशी चर्चा जनसामान्यात जोर धरत आहे. संबंधित लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा व  शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल का असाही जनतेत प्रश्न निर्माण होत आहे . परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास व होणाऱ्या पावसाच्या पाण्याने पुन्हा नुकसान होणार नाही याची खबरदारी लघुपाटबंधारे विभागाने न घेतल्यास आमरण उपोषणाचा  इशारा संबंधित शेतकरी व संपादक सुधाकर चौधरी  यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी मॅडम आपण या प्रकरणाची सखोल  स्पॉट चौकशी करून नुकसानाची पाहणी करावी व शेतकऱ्यांचा न्याय द्यावा आश्वासने व थातूरमातूर शिबिरे घेऊन शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार नाही. परिसरातील शेतकरी अडचणीत असल्यामुळे मी सुधाकर चौधरी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करीत आहोत

Post a Comment

0 Comments