काही नराधनाच्या माध्यमातून
राज्यात अल्पवयीन मुली आणी
महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलून ऊपाययोजना करावी आणी महिलांवरील अत्याचार्यांच्या घटनांच्या निषेधार्थ मंगरुळपीर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातुन शांतता व सुव्यवस्थेचा विचार करून
आक्रोश मोर्चाचे आयोजन आज रोजी करण्यात आले होते. भर पावसात शेकडो महिलांनी या मोर्चात सहभाग नोदवला आणी शहरातील मुख्य मार्गे हा मोर्चा काढुन आपल्या मागण्याचे लेखी निवेदन मंगरूळपीर येथील एस डि ओ, तहसिलदार आणी पोलिस विभागाला सादर केले.
बदलापूरमध्ये एका शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळं, ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजावत आहेत, असं आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या महिलांचे म्हणणे आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. अशा घटना घडल्यानंतर यामध्ये राजकीय हस्तक्षेपही होताना दिसत आहे. लहान मुली महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. लहान मुली- महिलांवर सुरक्षित नाहीत. समाजात जनजागृती झाली पाहिजे. आपण जागरूक राहिले पाहिजे. लहान मुली महिलावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कायद्याने कठोर दंडात्मक शिक्षा मिळायला हवी अशा भावना व्यक्त करत घोषणा दिल्या .
सौ चंचल खिराडे , सुनिता पाटील, सौ सुनीता खिराडे ,सौ नयना पाटील ,सौ मनीषा पांडे, डॉ. सेजल खिराडे
चंदाताई ठाकूर , सौ रेशमा ठाकूर
सौ सरिता पुरोहित , सौ भावना बाबरे , वनमाला पेंढारकर, सौ रंजना बोरकर ,श्रीमती आदिती महाजन , सौ रेवती भालेराव ,सौ माधुरी महाजन , सौ गोगरकर काकू , प्रीती अर्धापूरकर , सौ अंजली रत्नपारखी, सौ राधा केदार , सौ सुरेखा वानखडे , वर्षा सचिन परळीकर , सौ मीना पार्डीकर , जयश्री विजय परळीकर, रूपाली सुर्वे , अंजली रवी म्हातारमारे , सौ जयश्री इंगळे, सुशिला सुळे , कुमारी चिमू करेले
मंगरूळपीर तालुक्यातील व शहरातील विविध संघटनांच्या माध्यमातून
शेवटी आपल्या मागण्याचे लेखी निवेदन प्रशासनाला सादर करुन या मोर्चाची सांगता करण्यात आली.......
0 Comments