Ticker

6/recent/ticker-posts

माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरूहोय! ज्यांचा समाजसेवेचा पिंड




वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समभाव अशा चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने काम करणारे 1967 पासून आतापर्यंत संघ परिवारासोबत जुडून आहे व प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असनारे
 शिव-शाहू- फूले -आंबेडकरी विचाराचे सच्चे पाईक व खरे  म्हणून ज्यांचं नाव घेतले जाते असे सन्माननीय पुरुषोत्तम  राजगुरू होय! ज्यांचा समाजसेवेचा पिंड  त्यांना राहवलेच जात नाही. अगदी साधी राहणी मात्र उच्च विचार सरणी हा पुरुषोत्तम  राजगुरू यांचा करारी बाणा आहे! आपल्या हातून समाजाचे काहीतरी भले झाले पाहीजे, या उदार अंतकरणाने वंचित, मागास, बहुजन समाजाचे आपणाला काही तरी देणे लागते, दुःखीत पीडितांसाठी  आपण काहीतरी केले पाहिजे अशा विचार असलेला माणूस समाजकार्यात गेल्या ५० वर्षापासून सर्वासाठी रात्र दिवस झटत असल्याचे आम्ही बघतो आहे. या महामेरूचे नाव पुरुषोत्तम नामदेवराव राजगुरू • वडिलांचे नाव : नामदेवराव पांडुरंग राजगुरू जन्म : 01 ऑगस्ट 1958
पत्ता : डॉ. आंबेडकर चौक, जुना नगर परिषद रोड. वाशिम - 444505
पत्नी : सीमा पुरुषोत्तम राजगुरू
धर्म : हिंदू जात : चांभार व्यवसाय : मंडप डेकोरेशन मोबाईल : 9822223475 

सार्वजनिक व राजनैतिक जीवनाचा प्रवास :> 1967 मध्ये संघ परिवारासोबत जुडलो.
> 1967 पासून आतापर्यंत संघ परिवारासोबत जुडून आहे व प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असतो.> वारकरी सांप्रदायाची परंपरा जोपासण्यासाठी आजोबांनी उभारलेले "श्री विठ्ठल मंदिर संस्थान, शुक्रवार पेठ. वाशिम" याचे अध्यक्ष पद कायम ठेवून मंदिराचा विकास करत आलो.
> 1980 पासून आत्ता पर्यन्त भारतीय जनता पार्टी (वाशिम) मध्ये सक्रिय आहे.
> 1990 मध्ये भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी मिळाली परंतु कौटुंबिक अडचणींमुळे मी उमेदवारी नाकारली.
> 1995 मध्ये पुनः मला उमेदवारीची संधी देण्यात आली व ती निवडणूक मी 45,550 या रेकॉर्ड मतांनी जिंकली.
> 1995 मध्ये माननीय श्री बबनराव घोलप साहेबांसोबत मिळून राष्ट्रीय चर्मकार महासंघ स्थापित केला.
> 1995 पासून ते आज पर्यन्त मी राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये सक्रिय आहे.
> 1997 पासून पांडुरंग शिक्षण संस्थेद्वारे प्रचलित स्व. नामदेवराव राजगुरु विद्यालय व महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडवले. आमदारकीचा काळ : > भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून निवडून आल्यावर सर्वप्रथम मी ग्राम दैवत श्री बालाजी मंदिरासमोरच्या रस्त्याचे काम केले.
> माझ्या करकिर्दीत मी वाशिम ला स्वतंत्र जिल्हा बनवण्याचे प्रयत्न केले व त्यामध्ये यशस्वी देखील झालो.
> वाशिम जिल्ह्यात पाऊस कमी पडतो म्हणून माझ्या कारकिर्दीत मी 15 सिंचन प्रकल्प आणले.
> माझ्या मतदारसंघात मी 60-70 प्रवासी निवारे बांधले.
> प्रत्येक प्रवासी निवाऱ्याला 1 हापशी उपलब्ध करून दिली.
> वाशिम शहरात 40-50 हापश्या उपलब्ध करून दिल्या.
> शेतकऱ्यांसाठी जवळ-जवळ 200 विहिरी मंजूर करून दिल्या.
> शाशन योजनेअंतर्गत 2000 हून अधिक घरांना इलेक्ट्रिक मिटर कनेक्शन मंजूर करून दिले.
> वाशिम रिसोड मुख्य रस्त्यावरचे 5 मुख्य पूल बांधले.
> पोस्ट ऑफिस शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज पर्यतचा मुख्य रस्ता मंजूर करून आणला.
> 30-40 स्मशान भूमी बांधल्या.
> वाशिम मधील गणपती मिरवणुकीच्या मुख्य रस्त्याचे बांधकाम केले.
> रिसोड ते पिंगळादेवी मुख्य रस्ता बांधला.
> रिसोड शहरातील मुख्य रस्ते बांधले.
व अशी अनेक कामे मार्गी लावली.
1999 मध्ये माझी कारकीर्द समाप्त झाली.
1999 मध्ये मी पुनः उमेदवारीसाठी मागणी केली परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
1999 पासून आता पर्यंत त्यांच्याकडे पार्टीचे कोणतेच पद नाही व मी
निस्वार्थपणाने एका सामान्य कार्यकत्या प्रमाणे पार्टीच्या सगळ्या मीटिंग, मोर्चे,
आंदोलन मध्ये सहभागी होत आलो आहे. माझ्या या सर्व विकास कामांची दखल घेऊन व माझ्या जनसंपर्काची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी ने 2024 च्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मला उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा बाळगतो व भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला स्तब्धपणे उभा राहील याची ग्वाही देतो. 


मूर्ती लहान, कीर्ती महान, असलेले समाजसेवक पुरुषोत्तम  राजगुरू
 रोग निदान शिबिर, आरोग्य शिबिर, रक्तगट शिबिर, रक्तदान शिबिरे, क्रीडा स्पर्धा, साहित्य संमेलने, कवी संमेलन, युवक मिळावे, सामाजिक कार्यकर्ता मेळावा, शेतकरी मेळावा, महिला मेळावा, व्यसनमुक्ती परिषद , वारकरी परिषद घेऊन उभ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे व्सन न करणारा
 व इतरांना व्यसनापासून दूर ठेवणारा मर्यादा पुरुषोत्तम 
भारत भूमीला जशी थोर महात्म्यांची साधू संतांची परंपरा आहे तशिस आगळ्या वेगळ्या क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने शिखर गाठलेल्या व्यक्तीची सुद्धा परंपरा आहे. महाराष्ट्र हे देशातील सामाजिक चळवळीचे एक अग्रगण्य राज्य आहे. या महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात फार मोठे मोलाचे कार्य केलेल्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामाजिक चळवळीत कर्तुत्वान निस्वार्थी भावनेने समाजसेवा करणाऱ्या   
पुरुषोत्तम नामदेवराव राजगुरू
माजी आमदार (वाशिम मंगरुळनाथ विधानसभा) भारतीय जनता पार्टी ने
यांना नजरेआड करून चालणार नाही. म्हणून अशा व्यक्तीची समाजाने नोंद घेणे काळाची गरज आहे. समाजसेवा, सामाजिक कार्याच्या चळवळीतील गेली अनेक वर्षे अहोरात्र कार्यरत असलेल्या आपल्या कार्याने जिल्ह्यातील ग्रामीण सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र असा ठसा उमटवणारा धडाडीचा कार्य करणारा समाजसेवक कार्यकर्ता माजी आमदार पुरुषोत्तम  राजगुरू होय.

Post a Comment

0 Comments