Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्याच्या विकासाचे महामेरू ज्ञान गंगेचा भगीरथ सुभाषरावजी ठाकरे


 



 शिक्षण विषयक सिध्दांताने प्रेरित होवून व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. जो प्राशन करेल, तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. या दिव्य संदेशाच्या साक्षीने सामान्य कुटुंबात जन्मास आलेल्या माणसांचा दारिद्रयाच्या अंधारात खितपत पडलेल्या दीनदलित, पददलित, भटक्या विमुक्तांच्या बकाल असणाऱ्या तांडेवाड्या, वस्त्यांचा हाडाचे काड अन् रक्ताचे पाणी करणाऱ्या शेतकरी शेतमजुरांचा सर्वागिण विकास व्हावा या उदात्त हेतूने आमचे आधारस्तंभ असणान्या आदरणिय सुभाषराव ठाकरे 
आदरणीय सुभाषराव पंढरीनाथ ठाकरे साहेब यांचे जन्म ठिकाण वाशिम जिल्ह्यातील ग्राम कासोळा तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम 
  साहेबाचे शिक्षण बी. ए.  साहेबांना अवगत असलेली भाषा  मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारी, साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उद्या आयुष्याच्या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या अर्धांगिनी स्वर्गीय सौ. कोकिळाबाई ठाकरे. साहेबांना
 राम-लक्ष्मणासारखी जोडी असलेले चंद्रकांत दादा राम ददा  साहेबांना   दोन मुले तीन मुली साहेब सुरुवात पासूनच शेती  करायचे  साहेबांचा पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , राजकीय पटलावरील ध्रुवतारा म्हटले तरीही 
वावग ठरणार नाही . साहेब   मंगरूळपीर विधानसभा व कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात साहेबांनी कार्यकर्त्याची मोठी फळी उभी केली साहेबांनी वाशिम जिल्ह्यातील गोर गरीब मुला मुलींना शिक्षण मिळावे म्हणून 
साहेब यांनी दुरदृष्टी ठेवून दि.7 जून 1983 ला कासोळा येथे ग्रामीण भागात व शिक्षणापासून कोसो दूर असणान्या सामान्यासाठी श्री मोतिरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळाचे बिजारोपन केले या संस्थेचा डोलारा जिल्हाभर फुलत आहे.. बहरत आहे. या बहरण्यानेच बहुजणांच्या  उन्नतीचा श्वास मोकळा झाला. साहेबांच्या समर्पित भावनेने शिक्षणप्रसाराचे विचार सतत मनात घोळल्याने ध्येयवेडया साहेबांनी कर्मविर भाउराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी निर्मिलेल्या पावलावर पावल ठेवीत : त्यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा जपत अनेक ठिकाणी दुर्गम भागात ज्ञानाची गंगा पोहचविली या ज्ञानगंगेच्या सिंचनाने अनेक बकाल वस्त्या बहरून गेल्या यामध्ये सुभाषराव ठाकरे साहेबांच्या तात्विक विचारांची श्रमप्रतिष्ठा, स्वालंबन व व्यक्ति स्वातंत्र्याच्या
मनोज्ञ संगमाचे प्रतिबिंब आढळते. कासोळा येथे लावलेल्या इवल्याशा रोपट्याने आज वार्डा-गिर्डा, कासोळा, कुंभी काजळांबा, मजलापूर आदी ठिकाणी ज्ञान वृक्षांच्या फांद्या
 शैक्षणिक विकासाकडे वाटचाल विद्यमान परिस्थितीत  एक सैनिक शाळा 3 महाविद्यालय 7  हायस्कूल इंग्रजी प्राथमिक शाळा शिक्षणाच्या माहेरघराचे विशाल वटवृक्ष उभे करून पंचकोशीतील गोरगरिबांच्या मुला मुलींसाठी शिक्षणाची सुवर्णसंधी उभी करून दिली.  मंगरूळपीर व मानोरा जिल्हा वाशिम तालुक्यात ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णासाठी रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम, सिंचन असो लोक न्यायालये सारखे उपक्रमात सक्रिय सहभाग. मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात शंकर पटाचे आयोजन साहेब उत्कृष्ट कबड्डी प्लेयर बी होते व इतर सामाजिक - सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. सुरुवातीपासूनच्या काळात करत आले व त्यांची राजकीय वाटचाल (अ ) 1967 मध्य मंगरूळपीर विकास संघर्ष समिती स्थापुन सामाजिक व विकास कार्यात सक्रिय सहभागाची सूचना.
 ( ब ) 1984 समाजवादी काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग.
 ( क ) अध्यक्ष मंगरूळपीर तालुका काँग्रेस कमिटी 1980 - 81
 ( ड ) सचिव अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी 1989 
 पक्ष संघटनेतील कार्य  संपूर्ण वाशिम जिल्हा व विशेष करून मंगरूळपीर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निर्माण करून पक्षाची भूमिका सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पक्षाच्या माध्यमातून साहेबांनी केले एवढ्यावरच थांबले नाही तर नगरपरिषद उमेदवाराकरिता  विदर्भात प्रचार सभा शेतकरी मेळावा. कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर. सर्कल कार्यकर्ता मिळावा इ.
 विधानसभा सदस्य  सन 1990 ते 1995 मंगरूळपीर मतदार संघात अपक्ष विधानसभा सदस्य म्हणून प्रतिनिधित्व. सन 1999 व 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगरूळपीर विधानसभेवर निवड व महाराष्ट्र मंत्रिमंडळात क्रीडा व युवक कल्याण परिवहन राज्यमंत्री पदही भूषविले. साहेबांचा छंद आणि विशेष आवड  वाचन. पोहणे. खेळणे. आदरणीय साहेबांनी आपल्या जीवनात भूषविलेली पदे 
( 1 ) 1990 ते 93 महाराष्ट्र विधानसभा अंदाज समिती सदस्य 
( 2 ) 1990 ते 95 महाराष्ट्र विधानसभा लोक लेखा समिती सदस्य.
( 3 ) खरेदी विक्री सहकारी संस्था मंगरूळपीर. संचालक 1978 ते 83 
( 4 ) सभापती मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती 1985 ते 90 
( 5 ) संचालक महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे 1988 ते 90
( 6 ) संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती 1988 ते 90 
( 7 ) अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रचनात्मक कार्य सेल अकोला जिल्हा 
( 8 ) सदस्य मंगरूळपीर तालुका खरेदी विक्री संघ 1978 ते 1983 
( 9 )  सदस्य मंगरूळपीर तालुका सुपर वायझिग युनियन. 1977 ते 81.
( 10 ) संचालक दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक लि अकोला.
( 11 ) सन 2004 मध्ये पुन्हा आमदार 
( 12 ) सन 2024 संचालक दि अकोला जिल्हा  बँक लि. अकोला.
असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आदरणीय सुभाषरावजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांचा जीवन परिचय पाहताना साहेब नेहमी आठवणीत राहतील असे केलेले कार्य
शालिनतेने जगण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. साहेबांचे हे तत्वज्ञान आभाळाच्या उंचीचे वाटतात. आज शिक्षण हाच आर्थिक बाबी व अर्थ कारणाचा मुलाधार बनला आहे. व्यापार, उद्योग, स्वयंरोजगार व्यवस्थापन व प्रशासन आदि क्षेत्रातल्या यशासाठी आधुनिक शिक्षण पध्दतीचा अवलंब करणे ही गरज ओळखून साहेबांनी एम. सी.व्ही. सी., डि. एड., शारिरीक शिक्षण, बि.एड. कला व विज्ञान आदि सह ग्रामिण भागात मराठी, इंग्रजी माध्यमाची विद्यालय निर्माण करुन गोरगरिबांच्या मुलांसाठी शैक्षणिक दालने समृध्द केली. आज साहेबांच्या तात्विक विचारांचा वारसा संस्थेचे सचिव आदरणीय दादासाहेब ठाकरे हे समर्थपणे चालवित आहेत. आज शाळेच्या २०-२२ शैक्षणिक प्रवाह वाढविणाऱ्या शाखा असून जवळपास दहा हजारापेक्षा अधिक विद्यार्थी ज्ञानार्जन करुन आपल्या भविष्याची वाट सोपी करीत आहे. अंधारलेल्यांना दिपस्तंभाचे कार्य करुन उजेडाची वाट दाखविणाऱ्या संस्थेस मी माजी विद्यार्थी या नात्याने वंदन करतो व तेवढ्याच दमाने ही संस्था आकाशाला गवसनी घालण्यासाठी प्रेरित करणाऱ्या मा. साहेबांना मानाचा मुजरा करतो. साहेबांच्या मार्गतत्वावर मार्गक्रमण करणारी ही संस्था दीनदुबळ्यांच्या मार्गावर भविष्यात उजेड
करित राहील याची ग्वाही सुध्दा देतो. जनसामान्यांच्या हाकेला धावून जाणारी म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सुभाषरावजी  ठाकरे साहेब
 वाशिम खबर महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी वाढदिवसानिमित्त मानाचा मुजरा


Post a Comment

0 Comments