Ticker

6/recent/ticker-posts

तिरंग्याच्या लहरींनी दुमदुमला सुपखेला – यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत हर घर तिरंगा रॅली


वाशिम तालुका प्रतिनिधी

आझादी का अमृत महोत्सव… देशभक्तीचा उत्सव… आणि त्यातच सुपखेला गावाच्या रस्त्यांवर तिरंग्यांच्या लहरींनी सजलेली रॅली… असा अविस्मरणीय सोहळा यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेने उभारला.


शाळेचे प्राचार्य सी. एम. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजनाने झाली. उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक पी. व्ही. ए. ए. गवळी, एम. पी. राऊत, एस. पी. नंदकुळे, एम. एन. ढोबळे, एन. ए. पडघान, ग्रंथपाल सतीशभाऊ चौधरी, कुमारी डी. पी. पाटील, कुमारी एस. एस. राऊत, कुमारी व्ही. एस. वाजपेयी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य ठाकरे यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण होताच, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताच्या सुरावटीने परिसरात देशप्रेमाची लहर पसरली. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी ‘घर घर तिरंगा’ व ‘हर घर तिरंगा’ या घोषणांनी सुपखेला गाव दुमदुमवू लागले. एकसंध पावलांचा आवाज, हातात उंचावलेले तिरंगे आणि चेहऱ्यावर देशप्रेमाचा तेजोमय भाव – पाहणाऱ्यांच्या मनात अभिमानाची भावना जागवत होते.

या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ शिक्षक बी. डी. सोनटक्के, आर. बी. ठाकरे आणि अब्दुल गौरवे यांनी विशेष मेहनत घेतली. शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ बंधू-भगिनी यांची उपस्थिती या उपक्रमाला अधिक भारदस्त बनवत होती.


“तिरंगा फक्त कापड नाही, तर आपल्या अस्मितेचा, बलिदानाचा आणि अभिमानाचा जिवंत प्रतीक आहे. ही रॅली म्हणजे त्या भावनेची गावोगाव ज्योत पेटवण्याचा प्रयत्न आहे,” असे प्रसिद्धी प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments