भस्मांचल'च्या रंगछटांमध्ये विणलेला मुळांचा शोध – कलाकारांचा भावस्पर्शी क्षण"
वाशी | प्रतिनिधी –
महाराणी प्रस्तुत “एव्हरी रिंकल टेल्स अ स्टोरी” मालिकेअंतर्गत, रंगभूमीवर अवतरतेय एक अनोखी कलाकृती – ‘भस्मांचल’. ही फक्त नाटकाची कथा नाही; ही विस्मृतीतील मुळे, हरवलेल्या ओळखी आणि काळाच्या ओघात झिजलेल्या नात्यांची हळवी कहाणी आहे.
“मुळे विसरली की, कितीही बळकट झाडं असली तरी ती कोसळतात” — हा हृदयाला भिडणारा विचार या रंगकृतीच्या केंद्रस्थानी आहे. संकल्पना मोहन नायर यांची असून, दिग्दर्शनाची सूत्रे हर्षल राणे यांच्या हातात आहेत. प्रोडक्शन सहाय्यक खुशनुर काझी, सह-दिग्दर्शिका रेवती आढाव यांच्या सोबत रेणू जैन आणि भावना सूर्यवंशी यांनीही महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
रेवती आढाव ‘रेणूजी’च्या सशक्त भूमिकेत २२ कलाकारांच्या ताफ्यासह रंगतदार सादरीकरण करणार आहेत.
ग्रँड प्रीमियर शो आणि पत्रकार परिषद २५ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडणार आहे. कलारसिक, रंगकर्मी आणि समाजमनाला एकत्र आणणारी ही सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
📌 स्पॉन्सरशिप, पासेस आणि स्वयंसेवकांसाठी संपर्क:
📞 94051 90985 | 88704 46815 | 88282 63682
ही संध्याकाळ केवळ एक प्रीमियर शो नसेल; तर आपल्या सांस्कृतिक मुळांशी संवाद साधणारा, विचारांना हलवून टाकणारा आणि मनाच्या गाभ्याला भिडणारा एक रंगप्रवास ठरेल.
शब्दांकन सुधाकर चौधरी,
94 21 15 11 73
0 Comments