Ticker

6/recent/ticker-posts

🛣️ प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मोठा भ्रष्टाचार!



वाशिम (प्रतिनिधी किशोर देशमुख)

वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे ही केवळ नावापुरती सुरू असून, गुणवत्तेचा गंधही नसलेली, निकृष्ट दर्जाची आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली आहेत.

सामान्य जनतेसाठी रस्ते म्हणजे संपर्काचं जीवनदायिनी साधन, पण इथे रस्ते म्हणजे भ्रष्टाचाराचा सडा! डांबरीकरणाऐवजी पाण्यात विरघळणारा थर, दर्जा तपासणं तर लांबच, आणि सर्वसामान्यांचा आवाज कुणी ऐकायला तयार नाही.

📉 काम सुरू होण्याआधीच ठेकेदारांची चंगळ सुरू – अधिकारी मूग गिळून गप्प!

वास्तविक पाहता, या योजना ग्रामीण विकासासाठी आहेत. पण या योजनांतर्गत झालेली कामं फक्त कागदोपत्री दर्जेदार दाखवली जात आहेत. डोंगरउतारांवर रस्ते चढवले जात आहेत, पाण्यात वाहून जाणाऱ्या रस्त्यांना उद्घाटनाची पताका लागते.

🗣️  प्रशासनावर घणाघात!

ज्येष्ठ समाजसेवक, अण्णा हजारे  राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी  यांनी जोरदार आवाज उठवला आहे.

"शासनाच्या नावाने चालणाऱ्या योजना प्रत्यक्षात फक्त कमिशनचा खेळ झालाय. विकासाच्या नावाने वाशिम जिल्ह्याचं भकास चित्र तयार झालंय.

 या रस्त्यांच्या भ्रष्ट कामांवर थेट बोट ठेवत प्रशासनाला जबाबदार धरलं आहे.

"कोट्यवधी रुपयांची कामं खड्ड्यात जात आहेत. विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक सुरू आहे. प्रशासन, ठेकेदार आणि काही राजकीय दलाल यांनी जिल्ह्याच्या रस्त्यांची वाट लावली आहे."

⚠️ विकासाच्या नावाने धुळफेक! – प्रश्न अनेक, उत्तरं शून्य

  • रस्ते कुठे आहेत, आणि खड्डे कुठे सुरू होतात हेच समजत नाही!
  • गुणवत्ता तपासणी कुठं आहे?
  • जिल्हा प्रशासन गप्प का?
  • रस्ते बनवणाऱ्यांवर अद्यापही कारवाई का नाही?

🚩 आंदोलनाची चेतावणी – दोषींवर कारवाई न झाल्यास संघर्ष उभारणार!

सुधाकर चौधरी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर 'राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास' वाशिम जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडणार.
"रस्त्यांवर चालता येत नाही, आणि आवाज उठवला तर दबाव आणला जातो – हे लोकशाहीच्या मुळावरच आहे!"


🧱 वाशिम जिल्ह्याचा विकास केवळ कागदावर!

वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीपासून आजवर प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि यंत्रणांकडून
✅ रस्ते
✅ शासकीय इमारती
✅ आरोग्य
✅ सिंचन
✅ शिक्षण
✅ कृषी
✅ रोजगार
✅ MIDC
या सर्वच क्षेत्रात आश्वासनं मिळाली… पण वास्तवात जनतेच्या पदरात पडलं ते फक्त उपेक्षेचं सावट.


📌 जनतेचा सवाल – 'रस्ता कुणाचा? खड्डे कुणाचे? जबाबदार कोण?'

आज जिल्ह्यातील जनतेला वाटतंय, “हा विकास नव्हे, ही फसवणूक आहे!”


संपर्कासाठी:

सुधाकर चौधरी
जिल्हाध्यक्ष – राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास, वाशिम
मो.: 9421151173



Post a Comment

0 Comments