वाशिम प्रतिनिधी –
जिल्हा राजकारणात प्रामाणिक कार्यशैली, सामाजिक सेवेत नेहमी पुढाकार, तर व्यापारी क्षेत्रात पारदर्शकता जपत असलेले नाव म्हणजे माननीय श्री पुरुषोत्तमजी चितलांगे भाऊ, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, वाशिम. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते, सामाजिक बांधव व व्यावसायिक मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
चितलांगे भाऊ हे चितलांगे इंडियन गॅसचे संचालक असून व्यापारी म्हणून त्यांनी नेहमी प्रामाणिकतेचा आदर्श ठेवला आहे. समाजातील गोरगरिबांची हाक ऐकून त्यांच्यासाठी उभं राहणं, मदतीचा हात पुढे करणे, हे त्यांचं वैशिष्ट्य ठरलं आहे.
कुठलाही कार्यक्रम असो, धार्मिक उत्सव असो किंवा समाजकारणाचा प्रसंग – चितलांगे भाऊंची उपस्थिती हमखास जाणवते. त्यांनी नेहमी सर्व पक्षीय, सर्व समाजघटकांमध्ये आपुलकीचे नातं जोडलं आहे.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामात त्यांनी जिल्हाभर फिरून कार्यकर्त्यांना दिशा दिली. कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याची त्यांची कळकळ आज प्रत्येक गावात पोहोचली आहे. त्यांचा साधेपणा, परखडपणा आणि लोकाभिमुख वृत्तीमुळे ते केवळ जिल्हाध्यक्ष नव्हे तर जनतेच्या मनात घर करणारे नेते ठरले आहेत.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक भागातून शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत आहे. समाजाच्या हाकेला धावून जाणारे, आपुलकीने माणुसकी जपणारे आणि सेवाभावाने अष्टपैलू ठसा उमटवणारे माननीय श्री पुरुषोत्तमजी चितलांगे भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
– शुभेच्छुक : सुधाकर चौधरी, संपादक – वाशिम खबर
0 Comments