Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूलमध्ये स्व. कोकिळाबाई सुभाषराव ठाकरे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन


अमोल पाटील व सौ. पाटील मातोश्री कोकिळाबाई सुभाषराव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना.

मंगरूळपीर (सुधाकर चौधरी)

 रोजी यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल येथे स्वर्गीय मातोश्री कोकिळाबाई सुभाषराव ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेत एक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात मातोश्रींच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. शाळेतील पालक प्रतिनिधी  अमोल पाटील यांनी सपत्नीक प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण केली. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या शारा मॅडम, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही पूजन करून आपली श्रद्धांजली अर्पण केली.

शाळेच्या प्राचार्या शारा मॅडम, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी मातोश्रींच्या प्रतिमेस अभिवादन करताना.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मातोश्रींच्या जीवनमूल्यांवर आधारित चित्रकलेद्वारे आपले विचार प्रकट केले. स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांना लवकरच पारितोषिके जाहीर केली जातील, अशी माहिती शाळेच्या प्रशासकीय समितीने दिली.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, कृतज्ञता आणि संस्कारांची भावना जागवणारा ठरला.


Post a Comment

0 Comments