Ticker

6/recent/ticker-posts

“दागिने नव्हे, तर प्रवाशांचे आयुष्य लुटणारी टोळी अखेर पोलिसांच्या तावडीत!” वाशिम पोलिसांची मोठी कामगिरी”

🔴 ब्रेकिंग न्यूज | वाशिम 🔴
चालत्या बसमध्ये दागिने, पर्स, पाकिटं चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला वाशिम पोलिसांचा जबरदस्त धक्का!

वाशिम जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चालत्या बसमध्ये प्रवाशांचे दागिने, पर्स आणि पाकिटं चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक अनसोल्व्हड चोरीच्या घटनांवर प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिनांक 13/03/2026 रोजी फिर्यादी निर्मला दिलीप श्रीनाथ (रा. रिसोड) या रिसोडवरून उमरखेड येथे बसने प्रवास करत असताना अनसिंगजवळ त्यांची पर्स चोरीला गेली. त्या पर्समध्ये सोन्याची पोथ व नगदी रक्कम होती. याप्रकरणी पोलीस स्टेशन अनसिंग येथे अप. क्र. 82/2026 कलम 303(2) भा.न्या. सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी सुरू केला. तपासादरम्यान बसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी सखोल गुप्त तपास सुरू ठेवला.

दिनांक 20/03/2026 रोजी वाशिम बस स्थानक परिसरात काही महिला संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तात्काळ रवाना करण्यात आले.

बस स्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी संशयित महिलांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांना अनसिंग पोलीस स्टेशन येथे नेऊन चौकशी केली असता त्यांनी 13/03/2026 रोजी चालत्या बसमध्ये पर्स चोरी केल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

1) लक्ष्मी व्यंकटेश गड्डी (वय 35 वर्ष)
2) कविता अशोक गड्डी (वय 30 वर्ष)
3) गंगम्मा उलगया गड्डी (वय 50 वर्ष)
   (सर्व रा. चिखलठाणा, जि. संभाजीनगर)

या आरोपींकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन अनसिंग करत आहे. या महिलांकडून आणखी अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

फक्त दागिनेच नव्हे, तर अनेकांचे पाकिटेही साफ!

या टोळीने केवळ दागिनेच नव्हे, तर प्रवाशांच्या पर्स, बॅग आणि पाकिटांवरही हात साफ केला असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, अनेक पीडितांनी न्याय मिळणार नाही या भीतीने तक्रारही दाखल केली नव्हती—ही बाब अत्यंत गंभीर आहे.

मोटारसायकल चोरी प्रकरणातही मोठी कारवाई

पोलीस स्टेशन रिसोड येथील अप. क्र. 118/2026 च्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी संतोष सुदाम पवार (रा. रिसोड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी गेलेली मोटारसायकल हस्तगत करून ती पोलीस स्टेशन रिसोडच्या ताब्यात देण्यात आली आहे.
सदर आरोपीकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

👮‍♂️ पोलिसांचे कौतुकास्पद कार्य

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे, पोउपनि शेखर मास्कर व त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली.


 — सावध राहा, सतर्क राहा!

ही घटना केवळ गुन्ह्याचा पर्दाफाश नाही, तर नागरिकांसाठी एक इशाराही आहे.
चालत्या बसमध्ये, गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत सतर्क राहणं अत्यावश्यक आहे.

👉 वाशिम पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांना मोठा धक्का बसला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे.

Post a Comment

0 Comments