Ticker

6/recent/ticker-posts

जीनियस लक्झरीज गर्ल्स हॉस्टेल : नांदेडमध्ये विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, आलिशान आणि पालकांचा विश्वास जिंकणारी नवी निवासव्यवस्था


नांदेड : उच्च शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या मुलींची आणि त्यांच्या पालकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे सुरक्षितता, स्वच्छता आणि योग्य वातावरण. याच गरजा लक्षात घेऊन नांदेड शहरात ‘जीनियस लक्झरीज गर्ल्स हॉस्टेल’ची दमदार सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षणासोबत हसत-खेळत, आनंददायी आणि प्रसन्न वातावरणात राहण्याचा अनुभव देणारी ही निवासव्यवस्था विद्यार्थिनींसाठी आकर्षण ठरत आहे.

तलाठी गल्ली, शारदा नगर येथे चंद्रलोक हॉटेलच्या पाठीमागे सुरू झालेल्या या हॉस्टेलमध्ये भव्य व स्वच्छ खोल्या, व्यवस्थित बेडशीट सेटअप, दररोज रूम क्लिनिंग, फरशी पुसणे, कपडे धुण्याची सुविधा अशा सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. “मुली सुरक्षित आणि समाधानी असतील तरच पालक निर्धास्त राहतील,” या ध्येयाने व्यवस्थापनाने सुरक्षा आणि शिस्तीवर विशेष भर दिला आहे.

शहरातील विविध क्लासेस, कोचिंग सेंटर आणि शैक्षणिक संस्थांच्या अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने विद्यार्थिनींचा वेळ आणि प्रवासाचा त्रास दोन्ही वाचणार आहेत. याशिवाय झेरॉक्स, स्टेशनरी आणि शैक्षणिक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची सुविधा ही मोठी जमेची बाजू ठरत आहे.

विशेष म्हणजे, विद्यार्थिनींना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दररोजचा मेनू पालकांपर्यंत पोहोचविण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे मुली काय खात आहेत याची माहिती पालकांना नियमित मिळणार आहे. बाजारभावापेक्षा कमी भाड्यात उत्कृष्ट आणि लक्झरी सुविधा देण्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.

प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून मर्यादित जागा उपलब्ध आहेत. सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह निवासासाठी एकदा भेट देऊनच प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७४९८३४४४२५ व ८२०८७९५७४२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments