Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर शहरातील देवकिभवन येथे ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साहात संपन्न


मंगरूळपीर सुधाकर चौधरी — मंगरूळपीर शहरातील देवकिभवन येथे पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार श्याम खोडे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, नगरसेवक गणेश खोडे, विरेंद्रसिंह ठाकुर, प्रा. नंदलाल पवार, सुनील मालपाणी, सुधीर घोडचर, गोपाल क्षिरसागर, शहराध्यक्ष अभिषेक दंडे, सुदर्शन धोटे, मंगेश धानोरकर, रवींद्र ठाकरे, सुरेश लुंगे, जगदीश  काबरा, शारीरिक सौदागर, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विविध सामाजिक विषय, देशाच्या प्रगतीतील जनसहभाग, तसेच प्रेरणादायी उपक्रमांवर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी मनोभावे कार्यक्रमाचे श्रवण करत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

यावेळी मान्यवरांनी ‘मन की बात’ हा कार्यक्रम समाजात सकारात्मक विचारांची जागृती करणारा असून, नागरिकांना देशाच्या विकासात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे मत व्यक्त केले. तसेच अशा उपक्रमांमुळे शासनाच्या योजना व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

एकूणच, मंगरूळपीर शहरातील देवकिभवन येथे पार पडलेला ‘मन की बात’ कार्यक्रम उत्साह, शिस्त व जनसहभाग यांचा उत्कृष्ट नमुना ठरला.

Post a Comment

0 Comments