Ticker

6/recent/ticker-posts

मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार; आढावा बैठकीत उत्साही वातावरण


मावळ, प्रतिनिधी श्रावणी कामत :
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक उत्साहात पार पडली. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संघटन बळकटीसाठी महत्त्वपूर्ण दिशा देण्यात आली.

तालुक्यात पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनसंपर्क वाढवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांना नव्या उर्जेसह काम करण्याचे आवाहनही करण्यात आले.


आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करत, आगामी काळात गावागावांत दौरे करून जनतेशी अधिक संवाद साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवण्याचा आणि विकासकामांना गती देण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त झाला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाच्या वाढत्या बळाची झलक पाहायला मिळाली.

बैठकीच्या शेवटी आमदार शेळके यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानले. “आपला विश्वास आणि सहकार्य हेच पक्षाच्या बळकटीकरणाचे खरे सामर्थ्य आहे. मावळच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करूया,” असे आवाहन त्यांनी केले.


Post a Comment

0 Comments