Ticker

6/recent/ticker-posts

प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न


वाशीम, दि. ११ : वाशीम जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या सानुग्रह अनुदान, भूसंपादन, पुनर्वसन, रस्ते व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांसह विविध प्रलंबित प्रश्नांबाबत बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. उपजिल्हाधिकारी दीपक बाजड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.


बैठकीस विभागीय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे गुरुजी, शिवदास पाटील ताठे, बाबुसिंग पवार, लघु पाटबंधारे विभागाचे संदीप इंगळे, रवी आरू, मृद व जलसंधारण विभागाचे भुतेकर, कार्यकारी अभियंता पिदडी, उपकार्यकारी अभियंता मोहिते आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माणिकराव गंगावणे गुरुजी यांनी वाशीम जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा आढावा घेतला. उपजिल्हाधिकारी दीपक बाजड यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांबाबत विचारणा केली तसेच प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

बैठकीत मैराळडोह (ता. मालेगाव), कोयाळी (ता. रिसोड), बग्गी (ता. कारंजा) व चोरद (ता. मंगरुळपीर) लघु पाटबंधारे योजनांमधील त्रुटी तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी मुकत्तार पटेल, संजय भरदुक, महादेव निंबोकार, शिवाजी घुगे, राधेश्याम शिरसाट, पुंडलिक घुगे, गणेशराव रहाटे, अशोक मगर, शंकर शिंदे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त बांधव-भगिनी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments