Ticker

6/recent/ticker-posts

जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसह दमदार प्लेसमेंट!

बीटेक सीएसईच्या तृषा आग्रे हिला ४.५० लाखांचे वार्षिक पॅकेज; आतापर्यंत १४२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

अमरावती अनिता यादव=शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वाचा अनुभव आणि पदवी पूर्ण होताच रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटी, अमरावतीतर्फे राबविण्यात येत असलेल्या कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या आणि कौशल्याच्या जोरावर विविध नामांकित कंपन्यांच्या निवडप्रक्रियेत यश संपादन केले असून, आतापर्यंत तब्बल १४२ विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे.

या यशात बीटेक (सीएसई) शाखेची विद्यार्थिनी तृषा आग्रे हिने विशेष कामगिरी करत साडेचार लाख रुपयांचे पॅकेज मिळविले आहे. कठीण निवडप्रक्रिया, कौशल्य चाचण्या आणि मुलाखतींच्या विविध टप्प्यांत प्रभावी कामगिरी करत तृषाने हे यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाचीही प्रभावी झलक समोर आली आहे.

पदवीसोबत रोजगाराची संधी

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार तयार करण्यावर विद्यापीठाचा विशेष भर आहे. पदवी आणि रोजगार यांची सांगड घालण्याच्या संकल्पनेतून दरवर्षी कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेत देशभरातील विविध क्षेत्रांतील कंपन्या सहभागी होत असून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

यंदाच्या प्लेसमेंट प्रक्रियेत डिजिटल हीरोज प्रायव्हेट लिमिटेड, कोरलेंस प्रायव्हेट लिमिटेड, इग्नाइट सोल्युशन्स, इनअमीगोस फाउंडेशन, ड्रोना पे प्रायव्हेट लिमिटेड, वुमन फर्स्ट इंडिया फाउंडेशन, शी कॅन फाउंडेशन, नवे पंख फाउंडेशन, युनेसा फाउंडेशन, ग्रामीण विकास सोसायटी, मार्पु प्रायव्हेट लिमिटेड, अर्थ५आर, रीड्युकेट.एआय लिमिटेड, हमारी पहचान एनजीओ, क्वांटम आयटी सोल्युशन्स, सुपर७७ प्रायव्हेट लिमिटेड, इंडिया रीडिफाइंड प्रायव्हेट लिमिटेड आदी संस्थांनी सहभाग घेतला आहे.

प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला धार

प्लेसमेंटपूर्वी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रशिक्षण सत्रे, कौशल्यविकास उपक्रम, मुलाखत तंत्र, संवादकौशल्य आणि उद्योगक्षेत्राच्या अपेक्षांनुसार आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. परिणामी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून, कंपन्यांच्या कठीण निवडप्रक्रियेत ते प्रभावी कामगिरी करत आहेत.

विद्यार्थ्यांना ‘शिक्षण पूर्ण करा आणि रोजगाराची वाट पहा’ या पारंपरिक पद्धतीऐवजी शिक्षण घेत असतानाच उद्योगक्षेत्राशी जोडण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे या प्लेसमेंटमधून स्पष्ट होत आहे. तृषा आग्रे हिचे ४.५० लाखांचे पॅकेज आणि १४२ विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी झालेली निवड ही त्याच प्रयत्नांची यशस्वी फलश्रुती मानली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी शिक्षण, कौशल्य आणि रोजगार यांचा त्रिवेणी संगम घडविण्याच्या दिशेने जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटीने आणखी एक यशस्वी पाऊल टाकले आहे.

Post a Comment

0 Comments