Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
वाशिमदि. १३ : केंद्र सरकारच्याजलसंसाधन, नदी विकास व गंगा पुनर्जीवन विभाग,जलशक्ती मंत्रालया मार्फत द्वितीय राष्ट्रीय जल पुरस्कार २०१९ साठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत.  या पुरस्कारामध्ये एकूण १३  घटकांसाठी वेगवेगळ्या स्वरुपात पुरस्कार देण्यात येणार आहेत. अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचे नुतनीकरण व नवीन जलस्त्रोतांची निर्मीती करून जतन करणे, जलस्त्रोतांचा प्रभावीपणे वापर व जलस्त्रोतांबाबत जनजागृती करणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
पुरस्काराविषयी केंद्र शासनाच्याwww.cgwb.gov.in अथवा www.mygov.in संकेतस्थळावरील मार्गदर्शक सुचनेनुसार उत्कृष्ट जिल्हा, ग्रामपंचायत, नगरपालिकाशाळा, महाविद्यालयवैयक्तिक, संस्था, निवासी कल्याण संस्था व उद्योग या घटकांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्याचे नियोजित असून अनुक्रमे रक्कम रुपये २  लक्ष,  रुपये १.५० लक्ष व रुपये १ लक्ष असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या पुरस्काराकरिता जिल्ह्यातील घटकांनी प्रस्ताव तयार करून ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत परस्पर संकेतस्थळावर केंद्र शासनास पाठवावेत व प्रस्तावाची एक प्रत वाशिम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय येथे सादर करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. 
                                     

Post a Comment

0 Comments