Ticker

6/recent/ticker-posts

उपविभागीय अधिकारी यांचे लेखी आश्वासनामुळे ताला ठोको आंदोलन तुर्तास स्थगित

शेतकरी संघर्ष संघटनेच्या पाठपुराव्याला यश

 वाशिम ते मालेगाव व वाशिम ते कनेरगाव महामार्गावरील संपूर्ण  खड्डे पंधरा दिवसांत बुजविणार

 उपविभागीय अधिकारी यांचे लेखी आश्वासनामुळे  ताला ठोको आंदोलन तुर्तास स्थगित
     
  वाशिम:
                     अकोला - नांदेड महामार्गावर " वाशिम ते मालेगाव- व वाशिम ते कनेरगाव नाका " पर्यंत प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली आहे. असंख्य सामान्य जनतेला यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो व आता शेतकरी बांधवांना सुद्धा त्यांचा शेतमाल विक्रीसाठी वाशिम- मालेगाव ला न्यावा लागतो. परिणामी दररोज एक- दोन अपघात होऊन वाटसरूंना मोठ्या प्रमाणात शारीरीक ईजा व प्रसंगी जीव गमवावा लागत आहे. पोटाचे,  मनक्याचे आजार असणारांना प्रचंड त्रास होत आहे.
          म्हणून विविध सामाजिक संघटनांकडून ज्यामध्ये अग्रस्थानी शेतकरी संघर्ष संघटना, सत्यशोधक समाज आदिंनी दिनांक 30 नोव्हेंबर ला सर्व संबंधीत कार्यालय व जिल्हा व पोलिस प्रशासन यांना निवेदन दिले होते.  5  नोव्हेंबर पर्यंत प्रत्यक्ष खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.  त्यानुसार आठ नोव्हेंबर रोजी त्याचे स्मरण देण्यासाठी महामार्ग देखरेख व दुरूस्ती ज्यांच्याकडे आहे त्या राष्ट्रीय महामार्ग  उपविभागीय कार्यालयावर संघटनेच्या पदाधिकारी यांनी  धडक दिली असता तेथील मुख्य अभियंता अधिकारी नवी मुंबई येथे असल्याचे फोनवरील संपर्कावरून कळाले.  सर्व बाबींची माहिती घेऊन साहेबांशी फोनवरून शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश अढाव यांनी चर्चा केली. एकूनच परिस्थिती गंभीर असून दररोज या महामार्गावर खड्डयांमुळे अपघात होत असल्याचे सांगितले. या अपघातांना कोणाला दोषी धरायचे? जर गुन्हा नोंदवायचा तर तो कुणावर? तुम्ही अत्यंत असंवेदनशिल वागत आहात, मोटर बाईक, छोटे- मोठे वाहनं यांचा 'रस्ता कर ' भरून घेता; एखादयाचा भरला नसल्यास आणि वाहन रस्त्यावर चालत असल्यास त्याला संबंधीत चेकिंग यंत्रणा मोठा दंड आकारते.  मग रहदारीसाठी चांगले रस्ते ठेवणे ही जबाबदारी तुमची नाही काय? कुठं तरी कंत्राटदाराला अभय देण्याचं काम हा विभाग करतोय अशी शंका घेण्यास वाव आहे! असे अनेक प्रश्न विचारले असता साहेब निरुत्तर होत कामाल सुरूवात करू असे सांगत होते. तीन- चार दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू असे चौधरी साहेबांनी फोनवरून आश्वासन दिले होते. . त्यावर विश्वास ठेवून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात गेलेली लोकं परत आली.परंतु त्यांच्या आश्वासनानुसार कार्यवाही म्हणजे प्रत्यक्ष खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास या कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करून रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा अढाव यांनी दिला  होता.
        या सर्व बाबींची तात्काळ दखल घेत राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अधिकारी चौधरी यांनी "वाशिम ते मालेगाव " व "वाशिम ते कनेरगाव" महामार्गावरील संपूर्ण खड्डे पंधरा दिवसांत बुजविणार असल्याचे लेखी पत्र अढाव यांना दिले आहे. म्हणून तुर्तास " ताला ठोको व रास्ता रोको " आंदोलन स्थगित करण्यात आले आहे परंतु  मिळालेल्या लेखी आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास नाईलाजास्तव आंदोलन करण्यात येईल असे अढाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.  खड्डे बुजविल्यानंतर बर्याच प्रमाणात नागरिकांना रहदारीसाठी सोयीचे होणार आहे.
          यावेळी शेतकरी संघर्ष संघटना जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ  अढाव ( मी ), सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजाननराव धामणे,   शेतकरी संघर्ष संघटना जिल्हा उपाध्यक्ष पंकजभाऊ सावध, संघटक अनिलभाऊ काठोळे,  शहराध्यक्ष श्रीरामभाऊ  कालापाड, उपाध्यक्ष विलासभाऊ लहानकर,   वाशिम तालुका संपर्क प्रमुख संतोषराव शिंदे, सुरेशभाऊ इंगोले, शे. सं. संघटना मालेगाव प्रवक्ता गणेशभाऊ इंगोले, वाशिम शहर सोशिअल मिडीया प्रमुख राज गिरहे, श्रिगीरी येथील कार्यकर्ते संतोष व इतर काही जन उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments

  1. Khup chhan karya kelat aapan ganesh bhau jai jijau jai shivray

    ReplyDelete