Ticker

6/recent/ticker-posts

रब्बीसाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे द्या सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची प्रशासनाकडे मागणी



मंगरुळपीर-खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रब्बी हंगाम पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे रुपये नसल्याने शासनाने त्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर,मानोरा,रिसोड,मालेगाव,वाशिम,कारंजा या सहाही तालुक्यात खरीप हंगामात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिके गेली असून पावसामुळे शेतकरी प्रचंड  संकटात सापडलाअसताना रब्बी हंगाम तोंडावर आला. रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे,खते खरेदीसाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीयेत. त्यामुळे शासनाने रब्बी हंगामातील पेरणी साठी लागणारे खते व बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मागील वर्षी पिकविमा व दुष्काळाचे अनुदानही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते उपलब्ध करून न दिल्यास सनदशीर मार्गाने शेतकर्‍यांचे आंदोलन ऊभे करण्याचा ईशाराही देन्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments