Ticker

6/recent/ticker-posts

24 तासापासुन विहीरीत असलेल्या ईसमाचा मुत्युदेह शोधून काढला,




24 तासापासुन विहीरीत असलेल्या ईसमाचा मुत्युदेह शोधून काढला,
संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाला भरीव यश.
आज  रीसोड पोलीस ठाण्याचे विलास मुंढे साहेब. आणी रीसोड तहसीलदार अजित शेलार साहेब. यांनी संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना भर जाहागीर ता.रीसोड जि.वाशिम येथील गावा लगतच्या एका शेतातील विहिरीत प्रकाश साहेबराव आंधळे रा.भर जहागीर. हा नातेवाईकांच्या सांगण्यावरून याच विहिरीत असल्याची शक्यता आहे.अशी माहिती दिली. आणी तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. लगेच पथक प्रमुख दिपक सदाफळे, आणी त्यांचे सहकारी ऋषिकेश तायडे, विकी साटोटे, सतीश ठाकुर, मयुर सळेदार,यासह शोध बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दुपारी एक वाजता पोहचले. या विहीरीत 45 फुट खोल आणी रुंद असल्यामुळे अन त्यातही आत मधे असलेल्या व्यक्तिच्या अंगावर कपडे नसल्याने शोध कामात अडथळा निर्माण होत होता. काल पासुन स्थानिक लोकांनी शोध घेतला असता परंतु पाणी जास्त प्रमाणात असल्याने अडथळे निर्माण झाले होते. शेवटी  संत गाडगेबाबा पथकाच्या जवानांनी एका तासात मुत्युदेह शोधून बाहेर काढला, यावेळी ठाणेदार अनिल ठाकरे, पोऊपनी. मुंडे साहेब, आणी बिट जमादार अणील कातडे साहेब, पांचाळ साहेब, डाके साहेब, आणी पोलिस कर्मचारी  हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments