उद्या अकोल्यात कोणत्या ही प्रकारचा बंद नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये-पोलीस प्रशासन
अकोला
समाजा मध्ये भीती व गैरसमजुतीचे वातावरण निर्माण व्हावे या हेतूने काही असामाजिक तत्वां कडून सोशल मीडिया वर काही अफवा प्रसारित केल्या जात असल्याचे दिसून येत आहे परंतु या मध्ये काहीही तथ्य नसून उद्या दिनांक22/12 /2019 रोजी कोणत्याही संगठणे कडून कोणत्याच प्रकारे बंद चे आयोजन करण्यात आलेले नाहीत. सर्व प्रकारचे दैनंदिन व्यवहार हें नित्य नियमानुसार सुरू राहणार आहे.
आज दिनांक 22/12/2019 रोजीचे निषेध सभेच्या निमित्ताने इंटरनेट सेवा किंवा सोशल मीडिया वर कोणत्याही प्रकारची निर्बंधे लावण्यात आलेली नाहीत. पोलीस प्रशासना कडून समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.सोशल मीडिया वर काही आक्षेपार्ह बाब आढळून आल्यास ती इतरांना पुढे न पाठविता त्याबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, अकोला येथील खालील क्रमांकावर सम्पर्क साधून माहिती देण्यात यावी 07242435500
07242445333
व्हाट्सएप क्रमांक 8805461100
0 Comments