Ticker

6/recent/ticker-posts






आज नागपुर येथे असोसिएशन ऑफ डीजिटल मिडीया इंडीपेन्डन्ट वेब न्यज पोर्टल च्या वतीने मा.सभापती , मा.मुख्यमंत्री , तथा आमदार विधानसभा यांना डीजीटल मिडीया तथा त्यातील कार्यरत पत्रकार यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड.अद्वैत चव्हाण, संघटक प्रा.पंचशील नकाशे, सचिव मनोहर हरणे, निलेश किर्तकार , प्रा.श्याम करंबे,  तुळशीराम अंबोरकर आदिसह पत्रकार बांधव उपस्थित होते. डीजीटल मिडीयाबाबत केंद्र सरकार चे नवीन बील प्रस्तावित आहे. त्यात असोसिएशनच्या वतीने सुचना तथा राज्य शासनाकडे विविध मागण्याबाबत सातत्याने पाठ पुरावा सुरू आहे. याला हुसेन दलवाई आ. श्रीकांत देशपांडे, आ.रवी राणा, जयंत पाटील आदिंनी संघटनेच्या पदाधिका -यांशी याबाबत सकारात्मक चर्चा तथा आश्वासित केले.

Post a Comment

0 Comments