Ticker

6/recent/ticker-posts

पारवा सर्कलमधील तीन बॅरेज मंजुरीसाठी प्रस्तावित जि प सदस्या सौ मयुरिताई पाकधने यांची माहीती

 
मंगरुळपीर ■
तालुक्यातील पारवा जिल्हा परिषद सर्कलमधील तीन बॅरेज मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ मयुरिताई चंद्रकांत पाकधने यांनी दिली आहे
                      तालूक्यातील पारवा सर्कलमधील घोटा-शिवणी,बोरव्हा-लखमापूर व सत्तरसावंगी याठिकाणी बॅरेज व्हावे यासाठी आपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे कडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे यांनी सदर तिन्ही बरेजेस चा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांचेकडे दिला आहे.तसेच ना पाटील यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे लवकरच यास मंजुरी मिळण्याची शक्यता असून या बरेजेस मुळे या सर्कलमधील ३६०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.त्यामुळे महत्वाच्या असलेल्या या बॅरेजेसच्या मंजुरीसाठी पुन्हा पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ पाकधने यांनी सांगितले. जनसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहू

Post a Comment

0 Comments