राज्य सरकारने आज याच वचनाची पूर्तता केली असून अतिवृष्टीग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील मदत म्हणून 2 हजार 297 कोटी 6 लाख 27 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.पहिला हप्ता वितरित करण्याचे आदेश राज्याच्या महसूल व वन विभाग यांच्याकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेती व बहुवार्षिक पीकांचे किमान 33 टक्के नुकसान अशा बाधित शेतकऱ्यांना जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पीकांसाठी 25 हजार रुपये प्रतिहेक्टरच्या मर्यादा देण्यात आल्या आहेत.
0 Comments