Ticker

6/recent/ticker-posts

भविष्यात राष्ट्रवादीचे नेतृत्त्व कुणाकडे असणार? शरद पवारांनी सांगितली 3 नावं! शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वारसदार कोण असणार, नेतृत्व कुणाकडे असणार? अशी चर्चा अनेकदा होत असते.



◆ राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार  यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वारसदार कोण असणार, नेतृत्व कुणाकडे असणार? अशी चर्चा अनेकदा झाली. अखेर या चर्चेबद्दल खुद्द शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी पक्षातील तीन नेत्यांचा उल्लेखही केला आहे.शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार

भविष्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व कुणाकडे असणार  राष्ट्रवादी पक्षामध्ये असे अनेक नेते आहे जे नेतृत्व करण्याच्या कुवतीचे आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भविष्यात शरद पवार हे पुतण्याला नव्हे तर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करतील असं विधान करून अजित पवारांना टोला लगावला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरू झाली होती. शरद पवार याबद्दल  त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे. 'सुप्रिया सुळे यांना राज्यात इंटरेस्ट नाही, त्यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना संसदपटू पुरस्कार मिळाला होता.  प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो, त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट हा राज्यात नसून तो राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आहे' असं शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.एकत्र बसून कुणी याची जबाबदारी घ्यायची याचा निर्णय  कुणीही घेऊ शकतो. जो सर्वांना मान्य असेल.  एकत्र आणण्याची क्षमता एक भाग आहे आणि ज्या व्यक्तीवर नेतृत्व देण्याची जबाबदारी टाकू त्याच्या नेतृत्वाची क्षमता असणे हे महत्त्वाचे आहे. वेळ जेव्हा येईल, तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आणि ती वेळ फार लांब नाही. 

●●○●●●●●●●●●●●●●●●●●●


लाईनमन महिला कर्मचारी पोलवर काम करताना या महिलेला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा

Post a Comment

0 Comments