मंगरूळपीर :( तालुका प्रतिनिधी)
एकता पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती जुने पंचायत समिती सभागृह मंगरूळपीर येथे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख व्याख्याता सविता अतकरे मोरे उपशिक्षणाधिकारी वाशिम यांचे शाहू महाराजांविषयी व्याख्यान झाले. मंचावर प्रमुख अतिथी डॉ.अरविंद भगत प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी ,नितीन लुंगे बाल विकास अधिकारी, हिरालाल जांभुळकर उप अभियंता महावितरण, वाढणकर पंचायत समीती,विनोद डेरे सामाजीक कार्यकर्ते आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते .
याप्रसंगी विविध क्षेत्रात सर्वच स्तरावर कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने कोरोना काळामध्ये मदत कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मंगरूळपीर शहरातील मीर आशीक अली , सेवानिवृत्त होऊनही आपली सेवा आजही देत असलेले अरुण विष्णू भगत ,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी तत्पर सिद्धार्थ विद्यालयाच्या आदर्श मुख्याध्यापिका किरण कांबळे ,राजू सोनोने, भास्कर जीवने ,सिद्धार्थ कांबळे ,महिला तक्रार निवारण समितीचे संतोष भगत ,बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या उत्थनासाठी कार्य करणारे देवानंद हरिभाऊ राऊत वर्षभरात 500 पेक्षा जास्त प्रस्तुती करणाऱ्या कुसुमबाई हरी जाधव चित्रा गोपाल चाबुकस्वार उत्कृष्ट आशा पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातून निर्मला मिलिंद गवारगुरु लता दगडू भगत, महिला राजसत्ता
आंदोलनाच्या वाशिम उत्कृष्ट कारभारी पुरस्कार प्राप्त अनिता गौतम वाघमारे ,नंदकिशोर मनवर, हुकुमचंद भगत ,माजी सैनिक प्रतिभाताई मडामे, अपूर्वा पांडे,महावितरणचे संतोष मुंदे ,फरिश्ता मानव सेवा संस्था हाफिज सय्यद फरहान, सिकंदर खान, जुनेद खान ,कु .रिया संतोष खडसे ,पालावरच्या मुलांची शाळा मोफत शिक्षण देणाऱ्या शिक्षिका संगीता ढोले महिला पोलीस, समाजसेविका सीमा डेरे,
अंगणवाडीच्या कार्यकर्त्या कौशल्याबाई बेलखेडे, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजिका पदमा मोहोड, विदर्भ स्तरीय नाट्य कलावंत पुरस्कार प्राप्त आरुषी गुजर, नीट परीक्षेत प्राविण्य प्राप्त हर्षल शरद मनवर पंचशिल इंग्लीश स्कूलचे जेईई प्राविण्य प्राप्त तन्मय राहुलदेव मनवर एच एस सी मध्ये जिल्हा परिषद हायस्कूल मधून खुशी दिलीप आंबेकर ,संध्या बाळू मेटकर, पवन वसंता विटकर ,नेहा गोपाल चौधरी ,श्वेता राजूभाऊ फरास, पूजा संतोष राऊत, कोमल गजानन धोटे ,दहावीतून सुबोध धनराज राऊत, दीक्षा संतोष जामन दीक्षा संतोष जामनीके, शिवानी गुणवंत बोथे,ज्योती वामन भोडने आसेगाव शेख आकीब शेख आरीफ,आवेज अहमद , मुशतफीक इकबाल मोहम्मद शाकीर, प्रा. जावेद खान उर्दू हायस्कूलचे मदीया सरोश ,रूहाना अनम,अ गणी, जवेरिया अन्जुम मुजीत शाह, अमान उर्दू तसमीया अब्दुल साजिद, सनाउरूज हाफिज अहमद, तल्ला खान वसीम खान, कलंदर्या उर्दू हायस्कूल सीमरा फातेमा अल्हर हुसैन, साक्षी महादेव मेंढेकर, मान्यवरांचा आदी विद्यार्थी यांचा सन्मानपत्र ,बुके ,ट्रॉफी देऊन सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आशा सेविका अंगणवाडी सेविका ,मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संचालन विनोद डेरे यांनी केले .तर कार्यक्रमाला राजा माने तालुकाध्यक्ष, गजनफर हुसैन शहराध्यक्ष ,अशोक राऊतराधेश्री, मोहम्मद राशिद, संदीप कांबळे ,रणजीत भगत, राजेश वानखडे , मुक्तार सागर ,विश्वास कुटे, नारायण आव्हाळे, नितीन गावंडे, डिंगाबर आव्हाळे ,व आदी एकता पत्रकार संघ मंगरूळपीरचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संदीप कांबळे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला पुरुषांची भर पावसात उपस्थिती होती .
0 Comments