Ticker

6/recent/ticker-posts

शेलूबाजार येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना

शेलुबाजार अज्ञात चोरट्यांनी शेलूबाजार येथील जुन्या वस्तीतील तीन ठिकाणी चोरी केल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिन्यासह एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज पळविल्याची प्राथमिक अंदाज आहे. शेलूबाजार येथील रहिवासी चेतन लामाडे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली की पत्नी माहेरी गेली असल्याने पत्नीचे दागिने व माझ्या आईच्या अंगावरील दागिने हे २४ ऑक्टोबरच्या रात्री घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवले होते. रात्री आई बहीण व मी घराचे चैनल गेटला कुलूप लावून समोरच्या घरातझोपायला गेलो. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी घराच्या बाहेरील लोखंडी चॅनेलला लावलेले कुलूप तोडलेले दिसले व कपाटातील साडया सामान हे अस्ताव्यस्त दिसले. लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने राणी हार, नेकलेस सोन्याच्या पोत, सोन्याचे पेंडल व मणी असलेली पोत, सोन्याचे बेसर असे एकूण ६० ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत दोन लाख चाळीस रूपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून


नेल्याचे लक्षात आले. त्यांच्या फिर्यादीवरून शेलुबाजार पोलीस चौकीत फिर्याद दाखल करण्यात जाली. याच रात्री गावातील दत्तात्रय सोनटक्के व उज्चल डोफेकर यांच्या घरी सुद्धा चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. घटनास्थळी सपोनि मंजुषा मोरे यांनी भेट देऊन चोरीच्या घटनेची माहिती घेतली व डॉग स्कॉड युनिटला पाचारण केले. चोरीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Post a Comment

0 Comments