मंगरुळपीर पोलीसांनी वाढत्या अपघात लक्षात घेता जनतेच्या
जीवनाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यांत आल्याने आज कारवाईत पोलीसांचे वतीने विना हेल्मेट मोटार सायकल चालवणाऱ्या 23 मोटर सायकल चालकांवर दंडात्मक कारवाई केली ज्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते अशा मोटार सायकल चालंकाकडून प्रत्येकी 500/-- दंड आकारण्यात आला वाहन चालकाला आवाहन करण्यात आले की आपल्या जीवनाच्या सुरक्षे साठी व आपल्या कुटूंबाच्या सुखी जीवना आपण यापुढे हेल्मेट घालुनच मोटार सायकल ने प्रवास करावा
आजरोजी करण्यांत आलेल्या कारवाई मध्ये मंगरूळपीर पोलीस स्टेशन वाहतूक कर्मचारी यांनी व मा पोलीस अधिक्षक यांचेकडून अधीकचे मनुष्य बळ म्हणून पाठवण्यांत आलेले जिल्हा वाहतूक शाखेचे 2 कर्मचारी यांनी कारवाईत भाग घेतला जनतेनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलीसांनी केले


0 Comments